
Better.com कंपनीचे सीईओ विशाल गर्गने (CEO Vishal Garg) झूम कॉलद्वारे ९०० लोकांना कामावरून काढून टाकले होते. हा आकडा कंपनीमधील एकूण कर्मचारी संख्येच्या नऊ टक्के आहे. यानंतर विशाल गर्ग यांनी माफी मागितली होती. मात्र माफी मागितल्यानंतरही विशाल गर्ग यांना तात्काळ सक्तीच्या रजेवर (Vishal Garg Sent On leave) पाठवण्यात आलं आहे.
सध्या Better.com कंपनी चर्चेत आहे. कंपनीचे सीईओ विशाल गर्ग(CEO Vishal Garg) यांनी तीन मिनिटांच्या झूम कॉलमध्ये कंपनीतील ९०० कर्मचाऱ्यांना(900 Employees Fired On Zoom Call) कामावरुन काढून टाकलं होतं. यानंतर विशाल गर्ग यांनी माफी मागितली होती. मात्र माफी मागितल्यानंतरही विशाल गर्ग यांना तात्काळ सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे.
विशाल गर्ग यांना तात्काळ सुट्टीवर पाठवले जात आहे, अशी माहिती अमेरिकेच्या डिजिटल मॉर्टगेज कंपनीच्या बोर्डाच्या ई-मेलचा हवाला देऊन समोर आली आहे. मिळालेल्य माहितीनुसार आता विशाल गर्गच्या जागी मुख्य वित्तीय अधिकारी केविन रायन कंपनीचे दैनंदिन निर्णय घेतील आणि संचालक मंडळाला अहवाल देतील.
या आठवड्याच्या सुरुवातीला गर्गने झूम कॉलद्वारे ९०० लोकांना कामावरून काढून टाकले होते. हा आकडा कंपनीमधील एकूण कर्मचारी संख्येच्या नऊ टक्के आहे. विशाल गर्ग यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधल्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मात्र यानंतर विशाल गर्ग यांच्यावर टीका झाली. अशा पद्धतीने कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती.