खबरदार! केस, दाढी कापले तर होणार हे हाल…तालिबान्यांचा नवा फतवा

तालिबानने केस कापणे आणि दाढी करण्याचे प्रकार तर मुळीच खपवून घेतले जाणार नाही असा कट्टरपंथी फतवा अफगाणिस्तानच्या हेलमंद प्रांतात काढल्याचे वृत्त आहे. अफगाणी वर्तमानपात्र फ्रंटियर मेलच्या वृत्तानुसार सलून चालकांवरही अनेक बंधने घालत केश कर्तनाच्या व्यवसायावरही गदा आणली आहे

    तालिबान्यांनी अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर येथील आर्थिक, सामाजिक परिस्थिती प्रचंड प्रमाणावर चिडली आहे. तालिबान्यांनी केवळ महिलांवरच अनेक प्रकारची निर्बंध घातली आहेत असे नाहीतर आता त्यांनी अफगाण पुरूषांवर देखील बंधने घातली आहेत. या नियमाचे उल्लघंन झाल्यास त्यांना कठोर शिक्षा दिली जाईल, असंही तालिबान्यांनी सांगितलं आहे.

    तालिबानने केस कापणे आणि दाढी करण्याचे प्रकार तर मुळीच खपवून घेतले जाणार नाही असा कट्टरपंथी फतवा अफगाणिस्तानच्या हेलमंद प्रांतात काढल्याचे वृत्त आहे. अफगाणी वर्तमानपात्र फ्रंटियर मेलच्या वृत्तानुसार सलून चालकांवरही अनेक बंधने घालत केश कर्तनाच्या व्यवसायावरही गदा आणली आहे.केस कापण्यावर आणि दाढी करण्यावर प्रतिबंध असल्याचे इस्लामी परंपरांचा दाखला देत या अधिकाऱयांनी बजावले. नियम न पाळणाऱया सलूनचालकांची खैर नाही, असा सज्जड दमही या तालिबानी अधिकाऱयांनी केश कर्तनालय चालकांना दिला आहे.

    हेही केलेले चालणार नाही

    पुरुषांच्या सलून्स परिसरात संगीत, गाणे वाजवणे मुळीच खपवून घेतले जाणार नसल्याचे सांगत तालिबानी अधिकाऱयांनी सांगितले आहे याबाबत सोशल मीडियावरून तालिबानचा जुलमी आणि धर्मांध आदेश अफगाणी नागरिकांपर्यंत पोचवला जात आहे.