भीमशक्ती-शिवशक्ती संघटना शिवसेनेत सहभागी; उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत प्रवेश

महाराष्ट्रातून भीमशक्ती आणि शिवशक्तीमधून बहुजन आघाडी, अल्पसंख्यांक मुस्लिम समाज, रिपाइं यांनी आज उद्धव ठाकरेंच्या उपस्थित मातोश्री येथे पक्ष प्रवेश केला.

    मुंबई : शिवसेनेसोबत (Shivsena) संभाजी ब्रिगेडने (Sambhaji Brigade) युती केली आहे. त्यानंतर आता बहुजन आघाडी (Bahujan Aaghadi), अल्पसंख्यांक मुस्लिम समाज (Minority Muslim Community), रिपाइं (RPI) यांनी आज उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) उपस्थित मातोश्री येथे पक्ष प्रवेश केला.

    एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत जात राज्यात शिंदे-फडणवीस स्थापन केले. त्यानंतर राज्यातील राजकारण नव्या वळणावर आहे. त्यातच भीमशक्ती-शिवशक्ती संघटनांनी शिवसेनेत प्रवेश करत शिंदे सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली. जे काही महाराष्ट्रात घडलं ते कोणाला पटल नाही. एकनाथ शिंदेचे सरकार आहे ते व्यावहारिक दृष्टीने झालेले सरकार आहे. उद्धव ठाकरेंना विनाकारण पाय उतार व्हावं लागलं आहे. त्यासाठी आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.

    दसरा मेळाव्यावरुन शिवसेना आक्रमत झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना शिवाजी पार्कसाठी थेट न्यायालयाची पायरी चढणार आहे. त्यामुळे आता दसरा मेळावा थेट कोर्टात जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. हे. आपण फक्त आणि फक्त शिवतीर्थावरच घेणार अशी ठाम भूमिका शिवसेनेने घेतली आहे. आता महापालिकेने जर शिवसेनेला शिवाजी पार्क मैदान नाकारलं तर मात्र शिवसेना थेट कोर्टात जाणार आहे.