गतवर्षी एका अमेरिकन वृत्तपत्राने वॉशिंग्टन पोस्टचे पत्रकार जमाल खाशोगी यांच्या हत्येच्या कटाला सौदी अरेबियाचे क्राउन प्रिंस मोहम्मद बिन सलमान यांनी मंजुरी दिल्याचा दावा केला होता. खाशोगी सौदीसाठी धोकादायक असल्याचा प्रिंस यांना संशय होता, असेही या वृत्तात नमूद करण्यात आले आहे.
नवी दिल्ली – अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर पोहोचलेत. येथे त्यांनी क्राउन प्रिंस मोहम्मद बिन सलमान यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी 2018 मध्ये झालेल्या पत्रकार जमाल खाशोगींच्या हत्येसाठी त्यांना जबाबदार धरले.
बायडेन म्हणाले -मी बैठकीत जमाल खाशोगीच्या हत्येचा मुद्दा उपस्थित केला. मी याविषयी काय विचार करतो यावर चर्चा करणे गरजेचे होते. मी क्राउन प्रिंस मोहम्मद बिन सलमान यांना ते खाशोगींच्या हत्येसाठी जबाबदार असल्याचे ठणकावून सांगितले. त्यावर क्राउन प्रिंस म्हणाले – मी व्यक्तिशः पत्रकार जमाल खाशोगींच्या हत्येसाठी जबाबदार नाही. या हत्येमागे हात असणाऱ्या लोकांवर सरकार योग्य ती कारवाई करत आहे.
गतवर्षी एका अमेरिकन वृत्तपत्राने वॉशिंग्टन पोस्टचे पत्रकार जमाल खाशोगी यांच्या हत्येच्या कटाला सौदी अरेबियाचे क्राउन प्रिंस मोहम्मद बिन सलमान यांनी मंजुरी दिल्याचा दावा केला होता. खाशोगी सौदीसाठी धोकादायक असल्याचा प्रिंस यांना संशय होता, असेही या वृत्तात नमूद करण्यात आले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांचे सौदीच्या प्रिंसशी मैत्रीसंबंध होते. त्यामुळे खाशोगींच्या हत्येशी संबंधित अमेरिकन गुप्तहेर यंत्रणेचा अहवाल जारी करण्यात आला नव्हता. पण बायडेन यांनी अमेरिकेची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी मानवाधिकारांच्या मुद्यावर नेहमीच कठोर भूमिका घेतली आहे. त्यानुसार हा अहवाल जारी करण्यात आला आहे. या इंटलिजेंस रिपोर्टमध्ये खाशोगींच्या हत्येसाठी स्पष्टपणे प्रिंस सलमान यांचे नाव घेण्यात आले होते.