तुर्किची राजधानी अंकारामध्ये स्फोट; दहशतवादी हल्ल्याची भीती, सुदैवाने जिवीतहानी नाही!

तुर्कीची राजधानी अंकारामध्ये रविवारी दुपारी संसदेजवळ मोठा स्फोट झाला. सुदैवाने या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही.

    तुर्की  : तुर्कीमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. तुर्कीची राजधानी अंकारामध्ये रविवारी दुपारी संसदेजवळ मोठा स्फोट झाला. परिसरात गोळीबाराचे आवाजही ऐकू आल्याचे वृत्त आहे. हा मोठा दहशतवादी हल्ला (Turkey Terrorist Attack) होण्याची शक्यता असल्याची बाब असल्याचं बोललं जात आहे.

    संसदेजवळ झाला मोठा स्फोट

    तुर्कीची राजधानी अंकारा मोठा दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे. रविवारी दुपारी संसदेजवळ मोठा स्फोट झाला. परिसरात गोळीबाराचे आवाजही ऐकू आल्याचे वृत्त आहे. सध्या परिस्थितीचे गांभीर्य पाहता पोलीस आणि सुरक्षा दल घटनास्थळी पोहोचले आहेत. विशेष म्हणजे संसदेचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी ही घटना घडली आहे.

    तुर्कस्तानच्या गृह मंत्रालयाने या स्फोटाचे वर्णन ‘दहशतवादी हल्ला’ असे केले आहे. मंत्रालयाने सांगितले की, ‘आमच्या गृह मंत्रालयाच्या जनरल डायरेक्टरेट ऑफ सिक्युरिटीच्या गेटबाहेर दोन दहशतवादी सकाळी 9.30 वाजता आले आणि त्यांनी स्फोट घडवून आणला.’ सुदैवाने या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. विशेष म्हणजे तुर्कस्तानला काही काळापूर्वीच भूकंपाचा सामना करावा लागला आहे.