तैवानची नाकेबंदी; चीनी लष्कराकडून जल आणि हवाई क्षेत्रात गोळीबार

चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने तैवानच्या आसपासच्या परिसरात जल आणि हवाई क्षेत्रात थेट गोळीबार सुरू केला आहे. तसेच, रविवारी दुपारी १२.०० वाजता लष्कराचा सराव संपेल, असे सांगण्यात आले आहे. तैवानच्या किनार्‍यावरील सरावांमध्ये, चीन प्रथमच डीएफ-१७ हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांचा वापर करणार आहे. ही क्षेपणास्त्रे प्रथमच तैवानवरून उड्डाण करतील आणि चिनी सैन्य १२एनच्या आतील भागात प्रवेश करणार आहे.

    तैपेई : अमेरिकन सिनेटच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी (Nancy Pelosi) यांच्या भेटीनंतर चीन आणि तैवानमध्ये तणाव (China And Taiwan Tension) वाढला आहे. आता गार्डियन वृत्तानुसार, फ्लाइट ट्रॅकर्सवर (Flight Track) दोन अज्ञात विमाने दिसू लागली आहेत आणि ते तैवानच्या दक्षिणेकडील किनारपट्टीवर फिरत आहेत. चीनच्या सरकारी टेलिव्हिजनने वृत्त दिले की, चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने (Peoples Liberation Army) तैवानच्या आसपासच्या परिसरात जल आणि हवाई क्षेत्रात थेट गोळीबार (Firing) सुरू केला आहे. तसेच, रविवारी दुपारी १२.०० वाजता लष्कराचा सराव (Army Practice) संपेल, असे सांगण्यात आले आहे.

    तैवानच्या किनार्‍यावरील सरावांमध्ये, चीन प्रथमच डीएफ-१७ (DF-17) हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांचा वापर करणार आहे. ही क्षेपणास्त्रे प्रथमच तैवानवरून उड्डाण करतील आणि चिनी सैन्य १२एन (12n)च्या आतील भागात प्रवेश करणार आहे.

    अमेरिका सिनेटच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी ३ ऑगस्ट रोजी तैवानच्या दौऱ्यावर होत्या. यादरम्यान त्यांनी तेथील राष्ट्राध्यक्ष त्साई इंग-वेन आणि इतर खासदारांची भेट घेतली. राष्ट्रपतींना भेटण्यापूर्वी नॅन्सी यांनी तैवानच्या संसदेलाही संबोधित केले. पेलोसी यांनी तैवानच्या संसदेत सांगितले की, जगातील सर्वात स्वतंत्र समाजांपैकी एक म्हणून आम्ही तैवानची प्रशंसा करतो. आम्ही तुमचे म्हणणे ऐकण्यासाठी आलो आहोत. तैवानने कोरोनाविरुद्धच्या लढाईत एक आदर्श ठेवला आहे. तैवान-अमेरिकेच्या मैत्रीचा आम्हा सर्वांना अभिमान आहे, असेही त्या म्हणाल्या.