hafij saeed

कुख्यात दहशतवादी आणि मुंबईतील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड हाफिज सईद याच्या घराजवळ लाहोरमध्ये स्फोट झाला. लाहोरच्या जौहर टाऊन भागात हा स्फोट झाला आहे. या स्फोटात दोघांचा मृत्यू झाला तर 17 जण जखमी झाला आहे. हा तोच भाग आहे जिथे दहशतवादी हाफिज सईदचं घर आहे.

    लाहोर : कुख्यात दहशतवादी आणि मुंबईतील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड हाफिज सईद याच्या घराजवळ लाहोरमध्ये स्फोट झाला. लाहोरच्या जौहर टाऊन भागात हा स्फोट झाला आहे. या स्फोटात दोघांचा मृत्यू झाला तर 17 जण जखमी झाला आहे. हा तोच भाग आहे जिथे दहशतवादी हाफिज सईदचं घर आहे.

    हा बॉम्बस्फोट एवढा जबरदस्त होता की शेजारी असलेल्या इमारती आणि घरांच्या काचा फुटल्या. एका इमारतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. या ठिकाणी उभ्या असलेल्या काही कार आणि वाहनांचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.

    जे या हल्ल्यात जखमी झाले आहेत त्यांना कार आणि रिक्षाच्या माध्यमातून जिन्ना रूग्णालयात उपचारांसाठी पाठविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, हाफिज सईद स्फोटाच्या वेळी घरात होता की नाही याची माहिती मिळू शकलेली नाही.