
अमेरिकेचे वरिष्ठ संसर्गजन्य रोग तज्ज्ञ डॉ. अँथनी फौसी यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले आहे की, इंजेक्शननंतर कोरोना लसीचा बूस्टर डोस ६० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांना संसर्ग आणि गंभीर आजार होण्यापासून रोखू शकतो, असं इस्रायलनं केलेल्या अभ्यासातून समोर आलं आहे.
नवी दिल्ली : कोरोनासंदर्भात अजून एक माहिती समोर येत आहे. ज्या कोरोनानं जगभरात हाहाकार माजवला आहे. ज्या विषाणूचे दिवसेंदिवस नवनवे व्हेरिएंट येत असल्यानं लोकांच्या चिंतेत वाढ होत आहे. यातच याला पायबंद घालण्यासाठी लसीकरण मोहिम राबवली जात असल्यानं कोरोना आटोक्यात येत आहे. मात्र या लसीसंदर्भात तज्ज्ञांनी बूस्टर डोसची आवश्यकता असल्याचं सांगतिलं आहे.
अमेरिकेचे वरिष्ठ संसर्गजन्य रोग तज्ज्ञ डॉ. अँथनी फौसी यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले आहे की, इंजेक्शननंतर कोरोना लसीचा बूस्टर डोस ६० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांना संसर्ग आणि गंभीर आजार होण्यापासून रोखू शकतो, असं इस्रायलनं केलेल्या अभ्यासातून समोर आलं आहे. फायझरने युनायटेड स्टेट्स एफडीएला ५२ पानांच्या सादरीकरणात प्रस्ताव दिला आहे. यात नुकत्याच इस्रायलने केलेल्या अभ्यासाच्या डेटाचाही समावेश असल्याचं यांनी म्हटलं.कोरोना महामारी विरोधात अधिकाधिक सुरक्षितता मिळवण्यासाठी कोरोना लसीचा बूस्टर डोस लोकांसाठी लवकरच आवश्यक होईल, असा दावाही डॉ. अँथनी फौसी यांनी केला आहे.