देखो, देखो, भाई क्या कह रहे है ! म्हणे फायझरच्या लसीमुळे महिलांना येणार दाढी आणि माणसाची होणार मगर !

ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जायल बोल्सोनारो यांनी फायझर – बायोएन्टेकनं विकसीत केलेली लस ही अनेक दुष्परिणाम करू शकते, अशी शंका व्यक्त केलीय. या लसीमुळे महिलांना दाढी येऊ शकते आणि माणसाची मगर होऊ शकते, अशी शंका बोल्सोनारो यांनी व्यक्त केलीय. या लसीबाबत असे खळबळजनक आरोप करताना त्यांनी फायझर लसीच्या कराराची आठवण करून दिलीय.

कोरोनाविरुद्ध संपूर्ण जग सध्या लढा देतंय. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी सध्या बाजारात आलेल्या आणि येऊ घातलेल्या लसींकडं संपूर्ण जगाचं लक्ष आहे. फायझरने विकसीत केलेली लसदेखील बाजारात येण्याची सर्वजण प्रतीक्षा करतायत. मात्र ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांनी या लसीवर अविश्वास व्यक्त केलाय.

ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जायल बोल्सोनारो यांनी फायझर – बायोएन्टेकनं विकसीत केलेली लस ही अनेक दुष्परिणाम करू शकते, अशी शंका व्यक्त केलीय. या लसीमुळे महिलांना दाढी येऊ शकते आणि माणसाची मगर होऊ शकते, अशी शंका बोल्सोनारो यांनी व्यक्त केलीय.

या लसीबाबत असे खळबळजनक आरोप करताना त्यांनी फायझर लसीच्या कराराची आठवण करून दिलीय. या कंपनीने लसीच्या परिणामांची कुठलीही जबाबदारी घेण्यास नकार दिल्याकडं त्यांनी लक्ष वेधलंय. या लसीमुळे जर काही दुष्परिणाम झाले, तर त्याची कोणतीही जबाबदारी कंपनी स्विकारणार नाही, असं या कंपनीच्या करारार स्पष्टपणे लिहिलं असल्याचं त्यांनी सांगितलंय.

तुमची मगर झाली किंवा महिलांना दाढी आली किंवा तुम्ही सुपरमॅन झालात किंवा तुमचा आवाज बदलला, तर अशा कुठल्याही कारणांसाठी फायझर कंपनी जबाबदारी स्विकारणार नाही, असं ते म्हणाले. आपण स्वतः ही लस टोचून घेणार नसल्याचं त्यांनी जाहीर केलंय.

दरम्यान, अमेरिका आणि ब्रिटनसह अनेक देशांनी या लसीला मान्यता दिलीय. या देशांत लसीकरणदेखील सुरू झालंय. मात्र ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांच्या या वक्तव्यामुळं जगभरात या लसीबाबत संभ्रमाचं वातावरण तयार होण्याची शक्यता आहे.