
Breaking Latest World News International News Headlines Live updates News in marathi
International breaking Live News Marathi : सुनीता विल्यम्सच्या पृथ्वीवर परतण्याची उलटी गिनती सुरू झाली आहे. त्यांच्या परतीसाठी क्रू-10 मिशन सुरू करण्यात आले आहे. सुनीता आणि बुच 8 दिवस अंतराळात गेले होते पण अंतराळयानामध्ये काही तांत्रिक बिघाडामुळे ते गेल्या 9 महिन्यांपासून अंतराळात अडकले होते. 5 जून 2024 रोजी त्यांनी बोईंगच्या स्टारलाइनर अंतराळयानातून उड्डाण केले. आता संपूर्ण जग त्याच्या पृथ्वीवर परतण्याची वाट पाहत आहे.
15 Mar 2025 04:34 PM (IST)
जगप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ आणि नवे नॉस्ट्राडेमस क्रेग हॅमिल्टन पार्कर यांनी केलेल्या भविष्यवाण्या सतत चर्चेचा विषय बनत आहेत. त्यांनी आपल्या अनेक भाकितांनी जागतिक स्तरावर खळबळ उडवून दिली आहे. अलीकडेच त्यांनी, एक मोठा ऑइल टॅंकर अपघाताचा बळी ठरु शकतो अशी भविष्यवाणी केली होती. ही भविष्यवाणी 11 मार्च रोजी खरी ठरली. 11 मार्च रोजी उत्तर सुद्रात एक मोठा सागरी अपघात झाला. यानंतरच त्यांच्या भाकितांची चर्चा जगभर सुरु झाली.
15 Mar 2025 03:41 PM (IST)
जगातील सर्वात धोकादायक दहशतवादी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. इस्लामिक स्टेट (ISIS) चा प्रमुख आणि सर्वात धोकादायक आंतकवादी अबू खादिजा म्हणून ओळखला जाणारा अब्दुल्ला मक्की मुसलिह अल-रुफई इराकमध्ये मारला गेला आहे. इराकचे पंतप्रधाम मोहम्मद शिय अल-सुदानी यांनी ही माहिती दिली. इराक आणि अमेरिकेने मिळून याचा खात्मा करण्याचे मिशन हाती घेतले होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, आमच्या शूर योद्धानी त्यांना शोधले आणि त्यांच्या खात्मा केला.
15 Mar 2025 01:39 PM (IST)
बलुचिस्तानमध्ये २४ तासांत दुसऱ्यांदा दहशतवादी हल्ला झाल्याने परिस्थिती आणखीनच गंभीर झाली आहे. केच जिल्ह्यात झालेल्या या हल्ल्यात अनेक पाकिस्तानी जवान जखमी झाले असून, बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने हा हल्ला घडवून आणल्याचा संशय आहे. पाकिस्तानी लष्कराच्या ताफ्यावर बॉम्बने हल्ला करण्यात आला, ज्यामुळे मोठे नुकसान झाल्याचे समजते.
15 Mar 2025 11:35 AM (IST)
Trump Gaza Plan: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्त्रायलचे पंतप्रधान यांनी गाझातील पॅलेस्टिनींच्या पुनर्वसानासाठी आफ्रीकन देशांशी संपर्क साधल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये सुदान, सोमालिया आणि सोमालियाचा दुसरा भाग सोमालीलॅंडचा समावेश आहे. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी सुदानशी चर्चा केल्यानंतर त्यांच्या पॅलेस्टिनींच्या पुनर्वसनाच्या प्रस्तावाला सुदानी अधिकाऱ्यांनी नकार दिला आहे. तर सोमालिया आणि सोमालीलॅंडने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
15 Mar 2025 10:57 AM (IST)
सध्या अमेरिकेत गंभीर नैसर्गिक आपत्तीचा धोका निर्माण झाला आहे. काही भागांत हिमवादळ आणि चक्रीवादळाने प्रचंड नुकसान केले आहे. या वादळाचा प्रभाव 10 कोटीहून अधिक लोकांना होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अमेरिकेच्या मिसिसिपी, नॉर्थ प्लेन्स, टेक्सास आणि ओक्लाहोमा या भागांमध्ये टोर्नेडो चक्रीवादळ आणि हिमवादळाचा मोठा धोका असल्याे सांगण्यात आले आहे. यामुळे लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात भितीचे वातावरण पसरलेले आहे.
7:36pm CDT #SPC_Watch WW 36 TORNADO AR IL IN KY MO MS TN 150030Z - 150800Z, https://t.co/UJ3khsdSsZ pic.twitter.com/KFoX7tTuIO
— NWS Storm Prediction Center (@NWSSPC) March 15, 2025
15 Mar 2025 10:31 AM (IST)
अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींच्या वक्तव्यामुळे अमेरिकेत ग्रीन कार्डधारक असलेल्या 30 लाखांहून अधिक भारतीयांना धक्का बसला आहे. ग्रीन कार्ड कायमस्वरूपी राहण्याची हमी देत नाही आणि राष्ट्रपतींच्या निर्णयानुसार ते रद्द केले जाऊ शकते, असे जेडी व्हॅन्स यांनी स्पष्ट केले आहे. 2024 मध्ये ग्रीन कार्ड मिळणाऱ्या 50,000 भारतीयांसाठी ही बातमी विशेष चिंतेची आहे.
15 Mar 2025 10:22 AM (IST)
इराणमध्ये हिजाब कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यासाठी ड्रोनचा वापर केल्याचे समोर आले आहे. येथे, नजर नावाचे ॲप लोकांना कथित हिजाब उल्लंघनाची तक्रार करण्यास अनुमती देते, त्याद्वारे महिलांवर लक्ष ठेवले जाते. या अहवालात मानवी हक्कांचे उल्लंघन आणि महिलांवरील गुन्ह्यांचा उल्लेख आहे.
15 Mar 2025 10:16 AM (IST)
अमेरिकेत धोक्याची घंटा वाजत आहे. काही शहरांमध्ये एक प्रचंड वादळ वाटेत येणार सर्वकाही उध्वस्त करत आहे आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे अमेरिकेतील 100 दशलक्षाहून अधिक लोकांना या वादळाचा फटका बसणार आहेत. वादळामुळे मिसिसिपी, नॉर्थ प्लेन्स, टेक्सास-ओक्लाहोमा येथे या चक्रीवादळाचा धोका आहे. राष्ट्रीय हवामान सेवेच्या अहवालानुसार, या वादळामुळे ताशी 130 किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहू शकतात. इतकेच नाही तर काही भागात त्याचा वेग ताशी १६० किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो.