ब्रिटन ठरला ऑक्सफर्डच्या कोरोना लसीला मान्यता देणारा पहिला देश

औषधं आणि हेल्थकेअर उत्पादनं नियामक प्रशासनाने (MHRA) ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी/ अ‍ॅस्ट्राजेनेकाच्या कोरोना लसीसंबंधी केलेल्या शिफारसीला ब्रिटन सरकारने मान्यता दिल्याचे वृत्त येथील स्थानिक प्रसारमध्यामांकडून देण्यात आले आहे.

ब्रिटन : ब्रिटन हा ऑक्सफर्डच्या कोरोना लसीला मान्यता देणारा पहिला देश ठरला आहे. कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे ब्रिटनमध्ये सध्या दहशत पसरली आहे. त्यामुळे हा निर्णय ब्रिटनसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.

औषधं आणि हेल्थकेअर उत्पादनं नियामक प्रशासनाने (MHRA) ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी/ अ‍ॅस्ट्राजेनेकाच्या कोरोना लसीसंबंधी केलेल्या शिफारसीला ब्रिटन सरकारने मान्यता दिल्याचे वृत्त येथील स्थानिक प्रसारमध्यामांकडून देण्यात आले आहे.

दरम्यान, या लसी कोरोनाच्या नव्या प्रकारावर प्रभावी ठरतील की नाही अशी भिती व्यक्त केली जात होती. मात्र, याबाबतही दिलासा देणारे वृत्त आहे. कोरोनाची लस नव्या प्रकारावरही उपयोगी ठरेल असा विश्वास अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.

ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेत मात्र कोरोनाच्या नव्या विषाणूंनी थैमान घातला आहे. हा नवा प्रकार जास्त वेगाने परसत आहे. यामुळे अनेक देशांनी ब्रिटनसोबतचा व्यापार आणि विमानसेवा बंद केली आहे.