boris johson

ब्रिटनमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंटची लागण झालेल्या माणसाचा मृत्यू (First Death Due To Omicron Variant In UK) झाला आहे. हा मृत्यू ओमायक्रॉनमुळे झालेला पहिला मृत्यू आहे. स्वत: ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris Johnson Announcement About First Omicron Patient Death) यांनी याविषयी माहिती दिली आहे.

    लंडन: ओमायक्रॉनचे(Omicron) रुग्ण ठिकठिकाणी सापडत असताना चिंता वाढवणारी एक बातमी समोर आली आहे. ब्रिटनमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंटची लागण झालेल्या माणसाचा मृत्यू (First Death Due To Omicron Variant In UK) झाला आहे. हा मृत्यू ओमायक्रॉनमुळे झालेला पहिला मृत्यू आहे. स्वत: ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन(Boris Johnson Announcement About First Omicron Patient Death) यांनी याविषयी माहिती दिली आहे. हा व्हेरिंएट धोकादायक नाही, हा विचार नागरिकांनी सोडावा, असे आवाहनही त्यांनी केली आहे. या व्हेरिएंटमुळे देशातील रुग्णालयांवरील दबाव वाढत चालला आहे. यावर उपाय म्हणून सर्व तरुणांनी लसीकरण करुन घ्यावे, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.

    बेपर्वाई करु नका
    वेस्ट लंडनच्या पॅडिंगटनमध्ये लसीकरणाच्या वेळी पंतप्रधान जॉन्सन यांनी ही माहिती दिली.  जॉन्सन यांनी देशाला संबोधून संदेश सुरु केला तेव्हा ओमायक्रॉनमुळे पहिला बळी गेल्याची बातमी समोर आली होती.त्यामुळे त्यांच्या संदेशाची सुरुवात याच मुद्द्यावरुन झाली. द. अफ्रिकेचे डॉक्टर्स जरी हा व्हेरिएंट धोकादायक नसल्याचे सांगत असले, तरी नागरिकांनी याबाबत बेपर्वाई बाळगू नये, असे आवाहन जॉन्सन यांनी केले आहे. ज्या संख्येने कोरोनाचे रुग्ण वाढतायेत आणि रुग्णालयात दाखल होतायते, त्यावरुन हा व्हेरिंएट किती धोकादायक आहे, याची कल्पना आपल्याला यू शकेल, असेही त्यांनी सांगितले आहे. या व्हेरिंएटचा फैलाव वेगाने होत असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे इंग्लंडमधील सर्व नागरिकांनी तिसरा बूस्टर डोस घ्यावा अशी विनंती जॉन्सन यांनी केली आहे. पुढच्या अडीच आठवड्यांत दोन कोटी नागरिकांना बूस्टर डोस देण्यात येणार आहेत, अशी माहितीही इंग्लंडच्या पंतप्रधानांनी दिली आहे.

    जॉन्सन यांच्या भाषणानंतर भीती
    जॉन्सन यांनी देशाला संबोधून करुन केलेल्या भाषणानंतर आता इंग्लंडच्या नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. बूस्टर डोसच्या नोंदणीसाठी वेबसाईटवर लोकांनी उड्या मारल्या. त्यामुळे ही वेबसाईट क्रॅश झाल्याचीही माहिती आहे. लसीकरण केंद्रांसमोर लोकांनी गर्दी केल्याचीही माहिती आहे. इंग्लंडमध्ये ३० वर्षांवरील सर्वांना तिसरा बूस्टर डोस देण्यात य़ेत आहे. बुधवारपासून १८ ते २९ वयोगटातील तरुणही डोस बुक करु शकणार आहेत.