ब्रिटिश प्रसारमाध्यमांना रशियात प्रवेशबंदी

ब्रिटिश पत्रकारांनी (British Media) चुकीचे आणि एकतर्फी वार्तांकन (One Side Talk) करून ब्रिटनमधील नागरिकांमध्ये रशियाबद्दल चुकीचे चित्र उभे केल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. प्रवेशबंदी केलेल्यांमध्ये बीबीसी (BBC), द टाइम्स (The Times) आणि गार्डियन (Guardian) या माध्यमांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे.

    रशियाने (Russia) ब्रिटनमधील (Great Britain) अनेक माध्यमांना आणि संरक्षण क्षेत्राशी निगडित अनेक व्यक्तींना प्रवेश करण्यास मनाई केली आहे. युक्रेन युद्धात रशियाबाबत (Russia-Ukrain War) चुकीचे वृत्त प्रसारित केल्याचा ठपका (Blame) या सर्वांवर ठेवण्यात आला आहे. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने आज ही घोषणा केली. त्यानुसार, ब्रिटिश माध्यमांमधील २९ पत्रकार आणि निवेदकांनी युक्रेनमधील रशियाच्या कारवाईचे चुकीचे चित्रण जगासमोर मांडल्याने त्यांना प्रवेश करण्यास मनाई केली जात असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने (Ministry Of Forein Affairs) प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

    ब्रिटिश पत्रकारांनी (British Media) चुकीचे आणि एकतर्फी वार्तांकन (One Side Talk) करून ब्रिटनमधील नागरिकांमध्ये रशियाबद्दल चुकीचे चित्र उभे केल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. प्रवेशबंदी केलेल्यांमध्ये बीबीसी (BBC), द टाइम्स (The Times) आणि गार्डियन (Guardian) या माध्यमांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. याशिवाय, ब्रिटनमधील संरक्षण क्षेत्राशी संबंधित २० व्यक्तींनाही रशियात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. या व्यक्तींमध्ये नौदल प्रमुख, संरक्षण उपमंत्री, संरक्षण साहित्य निर्मिती करणाऱ्या कंपन्यांचे प्रमुख यांचा समावेश आहे.

    सुमारे महिन्याभराच्या संघर्षानंतर युक्रेनच्या पूर्व भागातील सिव्हिरोदोनेत्स्क या शहराच्या बहुतांश भागावर रशियाच्या सैन्याने ताबा मिळविला आहे. काही ठिकाणी अद्यापही युक्रेनचे सैनिक चिवट प्रतिकार करत आहेत. या शहरातील अझोट रासायनिक प्रकल्पात अनेक नागरिक अडकून पडले आहेत. या प्रकल्पावर रशियाचा बाँबवर्षाव सुरू आहे.