Buddhist monks, who have kept the Buddhist tradition alive for hundreds of years, are being trained in kung fu

नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये द्रक अमिताभ बौद्ध भिक्षूणी (नन) केंद्र सध्या चर्चेत आहे. कारण या केंद्रात ल्हामो आणि तिच्या बहिणी स्वसंरक्षणासाठी कराटे, कुंग फूचे प्रशिक्षण घेत आहेत. त्यांनी कुंग फू कराटेमध्ये प्रावीण्य मिळवले असून त्यांना कुंग फू नन म्हटले जाते. या नन्स शेकडो वर्षांची बौद्ध परंपरा जीवित ठेवून आहेत(Buddhist monks, who have kept the Buddhist tradition alive for hundreds of years, are being trained in kung fu). त्याचबरोबर आधुनिक काळानुरूप त्यात बदल करून नव्या जगातील आव्हानांचा सामना करण्याचे प्रशिक्षणही घेत आहेत.

    काठमांडू : नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये द्रक अमिताभ बौद्ध भिक्षूणी (नन) केंद्र सध्या चर्चेत आहे. कारण या केंद्रात ल्हामो आणि तिच्या बहिणी स्वसंरक्षणासाठी कराटे, कुंग फूचे प्रशिक्षण घेत आहेत. त्यांनी कुंग फू कराटेमध्ये प्रावीण्य मिळवले असून त्यांना कुंग फू नन म्हटले जाते. या नन्स शेकडो वर्षांची बौद्ध परंपरा जीवित ठेवून आहेत(Buddhist monks, who have kept the Buddhist tradition alive for hundreds of years, are being trained in kung fu). त्याचबरोबर आधुनिक काळानुरूप त्यात बदल करून नव्या जगातील आव्हानांचा सामना करण्याचे प्रशिक्षणही घेत आहेत.

    हिमालयाच्या दुर्गम डोंगराळ भागांत या महिला स्वसंरक्षणाचे धडे गिरवत आहेत. या महिलांचा आत्मविश्वास एवढा वाढला आहे की, त्या म्हणतात की, जर कोणी आपल्याकडे वाईट नजरेने पाहिले तर त्याचे डोळेही फोडून टाकू. या महिला कुंग फूसोबत गार्डनिंग, इले्ट्रिरक काम, कन्स्ट्रक्शन वर्क, कु किंग आणि सोलार पॅनलच्या दुरुस्तीच्या कामातही पारंगत आहेत. त्यांना अशा प्रकारची कामे करण्यासाठी कोणाही पुरुषावर अवलंबून राहावे लागत नाही.

    या बौद्ध नन्सनी दिल्ली, चंदिगड, मुंबईपासून लडाखपर्यंत स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण घेतले आहे. आता त्या अन्य महिलांना स्वसंरक्षणाचे धडे देत आहेत. सार्वजनिक ठिकाणी वावरताना छेडछाड करणाऱ्या पुरुषांचा कसा सामना करावा याचे प्रशिक्षण या बौद्ध नन्स अन्य महिलांना देत आहेत.