चीनच्या शिनजियांगमध्ये इमारतीला आग, १० जणांचा मृत्यू

चीनमधील शिनजियांगमध्ये एका इमारतीला आग लागली. या अपघातात १० जणांचा मृत्यू झाला असून ९ जण जखमी झाले आहेत. ही आग गुरुवारी रात्री उशिरा लागली. मात्र आगीचे कारण समजू शकले नाही. गेल्या चार दिवसांतील आगीची ही दुसरी घटना आहे.

    शांघाई – चीनमधील शिनजियांगमध्ये (Xinjiang) एका इमारतीला आग (Fire) लागली. या अपघातात १० जणांचा मृत्यू (Death) झाला असून ९ जण जखमी झाले आहेत. ही आग गुरुवारी रात्री उशिरा लागली. मात्र आगीचे कारण समजू शकले नाही.

    गेल्या चार दिवसांतील आगीची ही दुसरी घटना आहे. २२ नोव्हेंबर रोजी हेनान प्रांतात एका खासगी कंपनीच्या प्लांटला आग लागली होती. यामध्ये ३८ जणांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयितालाही ताब्यात घेतले होते.

    पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आम्हाला शिनजियांगची राजधानी उरुमाई येथे एका अपार्टमेंटला आग लागल्याची रात्री उशिरा बातमी मिळाली. पोलीस दल (Police) आणि अग्निशमन दलाच्या (Fire Brigade) गाड्या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या. या अपघातात १० जणांचा मृत्यू झाला आहे. तर ९ जण जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले आहे.