८०० वर्षांपूर्वींचा धगधगता लाव्हा ; मृत ज्वालामुखीचा पुन्हा एकदा उद्रेक

हवामान विभागाने सांगितलं की, आइसलँडची राजधानी रेक्याविकमध्ये असलेल्या रेक्येनीस पेनिनसुलामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फगराडल्स डोंगरावर असलेला ८०० वर्षांपूर्वीपासूनचा हा ज्वालामुखी मृत होता.

    आइसलँडची राजधानी रेक्याविकपासून जवळपास ३२ किलोमीटर दूर असणाऱ्या या ज्वालामुखीचा उद्रेक झाल्याचं पाहायला मिळालं. हवामान विभागाने सांगितलं की, आइसलँडची राजधानी रेक्याविकमध्ये असलेल्या रेक्येनीस पेनिनसुलामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फगराडल्स डोंगरावर असलेला ८०० वर्षांपूर्वीपासूनचा हा ज्वालामुखी मृत होता.

    दरम्यान, आता या ज्वालामुखीतून लाव्हा बाहेर येत आहे. तसेच ३२ किलोमीटर अंतरावरुनही हा ज्वालामुखी दिसून येत आहे. तसेच रिहायशी परिसरापासून हा ज्वालामुखी अत्यंत दूर आहे. या ज्वालामुखीजवळून जाणारा रस्ताही त्यापासून २.५ किलोमीटर आहे. तिथूनही ज्वालामुखीचा धगधगता लाव्हा अगदी स्पष्टपणे दिसत आहे.

    काही दिवसांपूर्वी हा भूकंप आला होता, त्यामुळे ज्वालामुखीचा उद्रेक होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. अशातच ज्वालामुखीचा उद्रेक होण्यापूर्वी सीस्मिक अॅक्टिव्हिटीही बंद झाली होती. ज्वालामुखीमुळे अद्याप आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आलं नाही. परंतु, लोकांना सतर्क राहण्यास सांगितलं आहे. तसेच घरांच्या खिडक्याही बंद ठेवण्यास सांगितलं आहे. प्रशासनाच्या वतीनं स्थानिक लोकांना घरातच राहण्यास सांगण्यात आलं आहे.