बझ ऑल्ड्रिन यांनी 93 व्या वर्षी केले चौथे लग्न, चंद्रावर पाय ठेवणारे दुसरे अंतराळवीर

बझ ऑल्ड्रिन यांनी फोटो शेअर करताना म्हटले की, वाढदिवशी दिनी जाहीर करताना मला आनंद होत आहे की, माझे दीर्घकाळचे प्रेम डॉ. आन्का फौर आणि मी लग्नबंधणात अडकलो आहे. आम्ही लॉस एंजेलिसमध्ये एका छोट्याशा खाजगी समारंभात विवाहाच्या बंधनांत अडकलो आहे. विशेष म्हणजे एखाद्या पळून जाणाऱ्या किशोरांप्रमाणेच आम्ही देखील इतकेच उत्साही आहोत.

    नवी दिल्ली – नील आर्मस्ट्राँग यांच्यानंतर चंद्रावर पाय ठेवणारे दुसरे व्यक्ती वयाच्या 93 व्या वर्षी चौथ्यांदा लग्नाच्या बोहल्यावर चढले आहेत. अंतराळवीर बझ ऑल्ड्रिन यांनी त्यांच्या 93 व्या वाढदिवसाला लग्नाच्या वाढदिवसाचे फोटो शेअर केले आहेत. 63 वर्षीय डॉ. आन्का फौर यांच्याशी त्यांनी लग्नगाठ बांधली आहे. डॉ. फौर आणि बझ आल्ड्रिन हे खूप दिवसांपासूनचे मित्र आहेत. पहिल्या बझ आल्ड्रिन हे शुक्रवारी 93 वर्षांचे झाले. ऐतिहासीक चंद्रायान मोहिमेचे एक भाग होते. त्यांची पत्नी त्यांच्यापासून 30 वर्षांनी लहान आहे. त्यांनी ट्विटरवर याची माहिती दिली.

    आल्ड्रिन यांची यापूर्वी तीन लग्ने
    बझ ऑल्ड्रिन यांनी फोटो शेअर करताना म्हटले की, वाढदिवशी दिनी जाहीर करताना मला आनंद होत आहे की, माझे दीर्घकाळचे प्रेम डॉ. आन्का फौर आणि मी लग्नबंधणात अडकलो आहे. आम्ही लॉस एंजेलिसमध्ये एका छोट्याशा खाजगी समारंभात विवाहाच्या बंधनांत अडकलो आहे. विशेष म्हणजे एखाद्या पळून जाणाऱ्या किशोरांप्रमाणेच आम्ही देखील इतकेच उत्साही आहोत. बझ आल्ड्रिन यांनी यापूर्वी तीन लग्न केलेले आहेत. यात त्यांनी घटस्फोट घेतला. जोन अॅन आर्चरशी 1954 ते 1974, बेव्हरली व्हॅन झिले 1975 ते 1978 आणि लॉइस ड्रिग्ज कॅनन 1988 ते 2012 पर्यंत त्यांच्या सोबत होत्या. चंद्रावर पाय ठेवणारे आल्ड्रिन यांना पहिल्या पत्नीपासून तीन मुले आहेत. जेम्स, जेनिस आणि अँड्र्यू अशी त्यांची नावे आहेत. तसेच त्यांना एक नातू जेफ्री शुस, मुलगी जेनिस आनि तीन पणतू आणि एक पणतू आहे.

    डॉ. फौर ‘बझ ऑल्ड्रिन व्हेनचर्स’च्या उपाध्यक्षा
    63 वर्षीय डॉ. फौर या सद्या Buzz Aldrin Ventures LLC च्या कार्यकारी उपाध्यक्ष म्हणून काम करतात. LinkedIn पेजवर त्यांनी 2019 पासून कंपनीसाठी काम करत असल्याचे दिसून येते. त्यांनी पिट्सबर्ग विद्यापीठातून केमिकल इंजिनीअरिंगमध्ये पीएचडी केलेली आहे. एकावेळी त्या कॅलिफोर्निया हायड्रोजन बिझनेस कौन्सिलच्या खजिनदार होत्या.