कॅनडाला खालिस्तान्यांचा पुळका, कॅनडातील भारतीय गुप्तचर प्रमुखाची हकालपट्टी, निज्जर हत्याकांडाचा भारतावरचं आरोप

आता कॅनडातील भारतीय गुप्तचर प्रमुखाची हकालपट्टी करण्यात आली आहे.  कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री जोली यांनी ही माहिती दिली. 

  खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येवरून (Hardeep singh nijjar killed) भारत आणि कॅनडामध्ये तणाव (India Canada Conflict) शिगेला पोहोचला आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो (Canadian Prime Minister Justin Trudeau) उघडपणे खलिस्तान समर्थकांच्या बाजूने बोलताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत, आता कॅनडातील भारतीय गुप्तचर प्रमुखाची हकालपट्टी करण्यात आली आहे.  कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री जोली यांनी ही माहिती दिली.

  नेमकं प्रकरण काय?

  कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी खलिस्तानी दहशतवादी निज्जरच्या हत्येतबाबत मोठं वक्तव्य केले आहे. कॅनडामधील कुख्यात खलिस्तानी दहशतवादी आणि भारतासाठी मोस्ट टेड असलेल्या हरदीप सिंह निज्जर याची १८ जून रोजी कॅनडात गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. हरदीप सिंह याच्या मृत्यूनंतर काही महिन्यांनी कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो यांनी हरदीप सिंह निज्जर यांच्यावर झालेल्या गोळीबारामागे भारत सरकारचा हात असल्याचा आरोप केला आहे. जस्टीन ट्रूडो म्हणाले की, देशाच्या सुरक्षा एजन्सी भारत सरकार आणि खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जर यांच्या हत्येचा संबंध तपासत आहेत. यावरुन आता दोन्ही देशामध्ये तणावाचं वातावरण आहे.

  कॅनडातील भारतीय गुप्तचर प्रमुखाची हकालपट्टी

  खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येप्रकरणी पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी भारताला कोंडीत पकडले आहे. 18 जून रोजी खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्ये प्रकरणी कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री मेलानी जोली यांनी एका भारतीय राजनैतिकाची हकालपट्टी केली आहे. वृत्तसंस्था एपीच्या वृत्तानुसार, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येत भारताचा सहभाग असल्याचा दावा केला आहे. कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री मेलानी जोली यांनी सोमवारी एका भारतीय राजनयिकाची हकालपट्टी केली.

  हरदीपसिंग निज्जरची गोळ्या झाडून हत्या

  भारत सरकारला हवा असलेला हरदीपसिंग निज्जर या वर्षी १८ जून रोजी झालेल्या गोळीबारात ठार झाला होता. निज्जर यांची गुरुद्वाराबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. 2022 मध्ये पंजाबमधील जालंधर येथे एका हिंदू पुजाऱ्याच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप झाल्यानंतर राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) निज्जरवर 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. पुजाऱ्याच्या हत्येचा कट खलिस्तान टायगर फोर्सने (KTF) रचला होता. कॅनडामध्ये राहणारा निज्जर केटीएफचा प्रमुख होता.