कोरोना गेला आता आला ‘हा’ व्हायरस; पक्ष्यांसह माणसांमध्ये पसरण्याचा आहे धोका…

कोरोना व्हायरसने (Coronavirus) जगभरात थैमान घातले होते. अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर आता पुन्हा एक व्हायरस आला आहे. 'एव्हियन फ्लू' (Bird Flu Virus in India) जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचत आहे.

    वॉशिंग्टन : कोरोना व्हायरसने (Coronavirus) जगभरात थैमान घातले होते. अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर आता पुन्हा एक व्हायरस आला आहे. ‘एव्हियन फ्लू’ (Bird Flu Virus in India) जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचत आहे. न्यूज एजन्सी रॉयटर्सने सांगितले की, या विषाणूचा धोका (Bird Flu Virus) केवळ पक्ष्यांनाच नाही तर माणसाला देखील धोका आहे. बर्ड फ्लूचा प्रसार माणसांमध्ये होत असल्याची चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तसेच पोल्ट्री फार्ममधील उद्रेक लवकर संपणार नाही. यामुळे जगाच्या अन्न पुरवठ्याला मोठा धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीतीही व्यक्त केली.

    अमेरिकेतील एपिडेमियोलॉजिस्ट एरिक फीगेल-डिंग यांनी एक ट्विट केले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले की, ‘अंड्यांच्या किमती वाढत आहेत. बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव वाढत आहे. एकट्या अमेरिकेत अंदाजे 58.4 दशलक्ष पाळीव पक्षी मारले गेले आहेत. प्रादुर्भाव झालेल्या कोंबड्यांना मोठ्या प्रमाणात मारावे लागत आहे. ज्यामुळे अंड्यांचे भाव वाढले आहेत. प्राणीसंग्रहालयांनी त्यांच्या पक्ष्यांना या संसर्गापासून वाचवण्यासाठी घरामध्ये ठेवले आहे. हा विषाणू सस्तन प्राणी, कोल्हे, अस्वल, मिंक, व्हेल, सीलला लक्ष्य करत आहे. त्यामुळे माणसांना देखील याचा धोका आहे.

    …पण लोकं सुरक्षित नाहीत

    शास्त्रज्ञांचा दावा आहे की, हा व्हायरस लोकांमध्ये पसरण्याचा धोका खूप कमी आहे. सेंट ज्यूड चिल्ड्रन्स रिसर्च हॉस्पिटलमधील विषाणूशास्त्रज्ञ रिचर्ड वेबी यांनी सांगितले की, प्रत्येक वेळी असे घडते तेव्हा विषाणूशी जुळवून घेण्याची दुसरी संधी असते. सध्या या आजाराची कमी प्रकरणे आहेत. मात्र, त्याचा धोका अधिक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.