
1 फेब्रुवारीपासून, ट्विटर युझर्स कोणत्याही खाते बंद करण्यासाठी निलंबनास अपील करू शकतील. तथापि, गंभीर धोरण उल्लंघनामुळे खाते निलंबन होऊ शकते. तसेच, खाते पुनर्संचयित करण्यासाठी, नवीन नियमांनुसार त्याचे पुनरावलोकन केले जाईल.
Twitter विकत घेतल्यानंतर टेस्लाचे मालक एलॉन मस्क ( Elon Musk) आता चांगलेच अॅक्टिव्ह झाले आहेत. त्यांच्या एंन्ट्रीनंतर ट्विटरमध्ये दररोज काही नवे बदल होत आहेत. या संदर्भात आता मोठी अपडेट आहे. कंपनीने खाते निलंबन धोरण बदलले आहे. कंपनीने शुक्रवारी याबाबत माहिती दिली. हा नवा बदल १ फेब्रुवारीपासून लागू होत आहे. या अंतर्गत वापरकर्ते त्यांचे खाते निलंबनाबाबत अपील करू शकतील. तसेच खाते रिस्टोर करण्यासाठी, नवीन निकषांनुसार सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्मचे पुनरावलोकन केलं जाईल. नवीन नियमानुसार, Twitter च्या धोरणाचे वारंवार उल्लंघन केल्यामुळेच ट्विटर खाते निलंबित केले जाऊ शकते.
कोणत्या कारणांसाठी ट्विटरवर बंदी घातली जाऊ शकते?
गंभीर धोरणांचे उल्लंघन झाल्यास खाती निलंबित देखील केली जाऊ शकतात. गंभीर धोरण उल्लंघनांमध्ये बेकायदेशीर सामग्री किंवा क्रियाकलाप, एखाद्याला धमकावणे किंवा हानी पोहोचवणे आणि त्रास देणे यासारख्या गोष्टींचा समावेश होतो. आगामी काळात कमी प्रकरणांमध्ये ‘गंभीर कारवाई’ केली जाईल, असे ट्विटरचे म्हणणे आहे.
मस्क यांचा खाते बंदीला होता विरोध
इलॉन मस्क हे ट्विटर डीलच्या काळापासून अकाऊंट निलंबित करण्याला विरोध करत होते. करार पूर्ण झाल्यानंतर, अनेक लोकप्रिय ट्विटर खाती पुनर्संचयित केली गेली आहेत, जी आधी बंदी किंवा निलंबित करण्यात आली होती. या यादीत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाचाही समावेश आहे. अलीकडेच बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतचे खातेही रिस्टोअर करण्यात आले आहे. कंगना राणौतचे अकाउंट दोन वर्षांपूर्वी बॅन करण्यात आले होते. इलॉन मस्क सातत्याने ट्विटरमध्ये अनेक बदल करत आहेत. आता प्लॅटफॉर्मवर तीन प्रकारचे पडताळणी बॅज दिले जात आहेत. जिथे सरकारी संस्था, अधिकारी आणि मंत्री यांना राखाडी रंगाचे बॅज मिळतात. त्याच वेळी, कंपन्यांना पिवळे बॅज देण्यात आले आहेत, तर वैयक्तिक वापरकर्त्यांना ब्लू टिक्स मिळत आहेत.