बोंबला! मिरची ७०० रुपये तर टोमॅटो २०० रुपये किलो; ब्रेड आणि दुधासाठी मोठ्या रांगा

श्रीलंकेत ब्रेड आणि दुधासाठी मोठ्या रांगा लागल्या आहेत. १०० ग्रॅम मिरचीची किंमत १८ रुपये होती, ती आता ७१ रुपये झाली आहे. म्हणजेच एक किलो मिरचीचा भाव ७१० रुपयांवर गेला आहे. मिरचीच्या भावात एकाच महिन्यात २८७ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

    कोलंबो  : कर्जात बुडालेल्या श्रीलंकामध्ये महागाई ही गगनाला भिडली आहे. खाण्यापिण्याच्या गोष्टीसह डिझेल आणि पेट्रोलच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे सर्व गोष्टीवर याचा परिणाम झाला( sri lanka economic crisis ) आहे.

    श्रीलंकेत ब्रेड आणि दुधासाठी मोठ्या रांगा लागल्या आहेत. १०० ग्रॅम मिरचीची किंमत १८ रुपये होती, ती आता ७१ रुपये झाली आहे. म्हणजेच एक किलो मिरचीचा भाव ७१० रुपयांवर गेला आहे. मिरचीच्या भावात एकाच महिन्यात २८७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. एका महिन्यात खाद्यपदार्थांच्या किंमती १५ टक्क्यांनी वाढल्याचं सांगण्यात आलं आहे. या वाढीचे सर्वात मोठे कारण म्हणजे आयातीत झालेली घट ( Vegetable Price Hike in Sri Lanka ) असल्याचे सांगितले जात आहे.