चिनी जेट्सची तैवानच्या एअरस्पेसमध्ये घुसखोरी, चीनचा सलग दुसऱ्या दिवशी युद्ध सराव

तैवानी संरक्षण दलाच्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी काही चिनी फायटर जेट्स व युद्धनौकांनी तैवान स्ट्रेटची मीडियन लाइनचे उल्लंघन केले. ते हेतुपुरस्सर तैवानच्या सागरी हद्दीत येण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही खबरदारी म्हणून क्षेपणास्त्र विरोधी यंत्रणा सक्रिय केली आहे. आमची चीनच्या कुरापतींवर करडी नजर असून, मॉनिटरिगसाठी काही विमाने व युद्धनौकाही पाठवल्या आहेत.

    नवी दिल्ली – चीनने तैवानच्या सीमेलगत सलग दुसऱ्या दिवशी युद्ध सराव सुरू केला आहे. यावेळी चीनच्या लढाऊ विमानांनी पुन्हा तैवानच्या हवाई हद्दीत घुसखोरी केली. तैवानी संरक्षण दलाच्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी काही चिनी फायटर जेट्स व युद्धनौकांनी तैवान स्ट्रेटची मीडियन लाइनचे उल्लंघन केले. ते हेतुपुरस्सर तैवानच्या सागरी हद्दीत येण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही खबरदारी म्हणून क्षेपणास्त्र विरोधी यंत्रणा सक्रिय केली आहे. आमची चीनच्या कुरापतींवर करडी नजर असून, मॉनिटरिगसाठी काही विमाने व युद्धनौकाही पाठवल्या आहेत.

    चिनी लष्कर तैवान लगतच्या ६ भागांत लष्करी सराव करत आहे. लष्करी सरावाच्या पहिल्या दिवशी चीनच्या १०० हून अधिक लढाऊ विमानांनी तैवानच्या उत्तर, दक्षिण-पश्चिम व दक्षिण पूर्व भागातील हवाई क्षेत्रात उड्डाण केले होते. अमेरिकन संसदेच्या सभापती नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान दौऱ्यामुळे चीन व तैवानमधील तणाव वाढला आहे. २ ऑगस्ट रोजी पेलोसी तैवानला पोहोचल्या होत्या. त्या परत जाताच चीनने तैवानलगत ४ ऑगस्ट रोजी लष्करी सरावाला सुरूवात केली.