चीनची अर्थव्यवस्था काही दशकांच्या मंदीच्या उंबरठ्यावर, भारतही ठरलाय कारण, एका झटक्यात संपलं 40 वर्षांचं वर्चस्व

चीन मंदीच्या (recession) मोठ्या कालावधीत प्रवेश करत असल्याचं आर्थिक तज्ज्ञांचं म्हणणंय. ही मंदी काही वर्षांची नव्हे तर काही दशकांची असण्याची शक्यता आहे.

    नवी दिल्ली – चीनची अर्थव्यवस्था (china economy) मोठ्या संकटात आहे. याचा परिणाम संपूर्ण जगावर होण्यास सुरुवात झालेली आहे. जगाची दुसरी मोठी अर्थव्यवस्था अशी ओळख असलेल्या चीनचा डोलारा गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं घसरताना दिसतोय. सध्या चीनमध्ये सुरु असलेल्या प्रॉपर्टी क्रायसेसमुळं परिस्थिती आणखीन बिघडली असल्याचं सांगण्यात येतंय. चीनच्या आर्थिक व्यवस्थेवर याचा परिणाम होण्यास सुरुवात झालेली आहे. चीनच्या अर्थव्यवस्थेनं भूतकाळात महत्वपूर्म आव्हानांचा खंबीरपणे मुकाबला केलेला आहे. मात्र सध्याच्या स्थितीत ज्या आर्थिक संकटांचा सामना चीन करतेय, त्या एकमेकांशी संबंधित आहेत. सातत्यानं येत असलेल्या आर्थिक अपयशामुळं, 40 वर्षांचं चीनचं यशस्वी विकास मॉडेल उध्वस्त होण्याची भीती निर्माण झालेली आहे. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग (Xi Jinping) हे यासाठी जबाबदार असल्याचं मानण्यात येतंय.

    आक्रमक धोरणांच्या आधारानं चीनला महासत्ता करण्याचा त्यांचा जो प्रयत्न आहे, तोच देशाच्या अर्थव्यवस्थेच्या अंगलट येत असल्याचं सांगण्यात येतंय. आर्थिक मंदीच्या दिशेनं चीनची वाटचाल? जागतिक उत्पादक-निर्मिती हब अशी चीनची ओळख आजही कायम आहे. मात्र काळाच्या ओघात म्हातारं होत चाललेलं मनुष्यबळ आणि जुन्या होत असलेल्या इंडस्ट्रींमुळे त्याचा फायदा भारताला होताना दिसतोय. जागतिक पातळीवर गुंतवणूक करणाऱ्यांना भारत गुंतवणुकीसाठी आपल्या बाजूनं करताना दिसतोय. त्याचबरोबर भारताकडे पुरेसं मनुष्यबळ उपलब्ध असण्याचा अतिरिक्त फायदाही भारतासारख्या देशाला होतोय. या क्रायकुशल मनुष्यबळानं जगातील सर्वात गतीनं वाढणारा देश असा लौकिक भारतानं आता संपादन केलेला आहे. चीनशी गेल्या काही वर्षांपासून बिघडलेल्या संबंधांमुळेही यात महत्त्वनाची भूमिका वठवलेली आहे. अमेरिकेसोबत चीनच्या सुरु असलेल्या व्यापार युद्धात चीनच्या आर्थव्यवस्थेचं मोठं नुकसान गेल्या काही वर्षांत झालेलं आहे. जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेसोबत संबंधांवरही त्याचा परिणाम झालेला आहे.

    मंदीत प्रवेश करतेय चीनची अर्थव्यवस्था

    चीन मंदीच्या (recession) मोठ्या कालावधीत प्रवेश करत असल्याचं आर्थिक तज्ज्ञांचं म्हणणंय. ही मंदी काही वर्षांची नव्हे तर काही दशकांची असण्याची शक्यता आहे. या मंदीचा परिणाम केवळ आर्थिक कमकुवतपणा नाही तर चीनची अर्थव्यवस्था तुटण्यापर्यंत वेळ येईल, असंही तज्ज्ञांचं म्त आहे. असं घडल्यास चीनसाठी हा मोठा वाईट कालखंड ठरण्याची शक्यता आहे. चीनमध्ये सुरु असलेल्या विकास कामांना यामुळं रोखावं लागण्याची शक्यता आहे. यात राष्ट्रपती जिनपिंग य़ांच्या बेल्ट अँड रोड हा महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचाही समावेश असेल. चीनच्या कर्जात 300 पटींनी वाढ चीन सध्या ज्या आर्थिक जोखमीतून जातोय, त्यात कर्जात मोठ्या प्रमाणात झालेली वाढ हेही एक महत्त्वाचे कारण आहे. चीनच्या सरकारनं आणि राज्यातील सरकारी मालकीच्या कंपन्यांनी वेगवेगळ्या स्तरावर घेतलेलं एकूण कर्ज हे चीनच्या जीडीपीच्या 300 टक्क्यांहून जास्त आहे. सातत्यानं पायाभूत सोयीसुविधांवर होत असलेला खर्च, संपत्ती बाजारात केलेली अत्याधिक गुंतवणूक याचबरोबर मागणीत आलेली घट आणि वाढत्या किमती याचा एकत्रित परिणाम आहे.