चीनच्या भेदभावी स्वभावाचं पुन्हा दर्शन! आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय खेळाडूंना नाकारला प्रवेश, भारतानं व्यक्त केली नाराजी

23 सप्टेंबरपासून चीनच्या झांगू येथे होणाऱ्या 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत अरुणाचल प्रदेशातील तीन भारतीय खेळाडूंना प्रवेश न देण्याच्या चीनच्या निर्णयावर भारताने कठोर भूमिका घेतली आहे. दिल्लीतील चिनी दूतावास आणि बीजिंगमधील भारतीय दूतावासाच्या माध्यमातून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

    चीनमधील हांगझोऊ येथे आशियाई क्रीडा स्पर्धेचे (Asian Games 2023) आयोजन करण्यात आले आहे.  23 सप्टेंबरपासून ही स्पर्धा सुरू होणार असून ते 8 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहेत. मात्र, चिनने त्याचा भेदभावी स्वभावाचं दर्शन देत पुन्हा वाद होऊल असं काहीतरी केलं आहे. चिनने आशियाई खेळ 2023 मधून अरुणाचल प्रदेशमधील खेळाडूंना प्रतिबंधित करण्यात केलं आहे. हे वुशू खेळाडूही असून यामध्ये न्यामन वांगसू, ओनिलू टेगा आणि मेपुंग लामगु यांचा समावेश आहे.

    भारतानं व्यक्त केली नाराजी

    चीनच्या या निर्णयाचा भारत सरकारने निषेध केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी शुक्रवारी (२२ सप्टेंबर) सांगितले की, चीन नेहमीच भारतीय नागरिकांशी वांशिकतेच्या आधारावर भेदभाव करत आला आहे. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य आणि अविभाज्य भाग होता, आहे आणि राहील.  अरुणाचलमधील भारतीय खेळाडूंना आशियाई क्रीडा स्पर्धेत प्रवेश न देण्याची चीनची कृती आशियाई क्रीडा स्पर्धेच्या भावनेचे आणि त्यात सहभागी होण्याच्या नियमांचे घोर उल्लंघन आहे, असे बागची म्हणाले. यामध्ये सहभागी सदस्य देशांनी भेदभाव न करता खेळाडूंमध्ये स्पर्धा सुनिश्चित केली पाहिजे. असेही ते म्हणाले.

    अनुराग ठाकूर यांनी रद्द केला चीनचा दौरा

    चिनच्या या निर्णयामुळे  भारताचे केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी चीनचा दौरा रद्द केला आहे. याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी भारताचे माहिती आणि प्रसारण मंत्री आणि युवा आणि क्रीडा व्यवहार मंत्री अनुराग ठाकूर यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेचा दौरा रद्द केला आहे.

    काय प्रकरण आहे?

    खरेतर, चीनने अरुणाचलमधील तीन वुशू खेळाडूंना आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रवेश नाकारला आहे. याचे कारण म्हणजे चीन अरुणाचल प्रदेश आपला भाग असल्याचा दावा करत आहे आणि तेथील नागरिकांना भारतीय म्हणण्यास हरकत आहे. यापूर्वी जुलैमध्येही चीनने अरुणाचलमधील खेळाडूंना प्रवेश देण्यास नकार दिला होता, ज्याचा भारताने तीव्र निषेध व्यक्त केला होता. चीनने हे सलग दुसऱ्यांदा केले आहे.