Does eating donkey meat increase sex power?

भारतीय सीमा भागांवर घुसखोरी गेल्यानंतर चीनने आता भारतीय गाढवे चोरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गेल्या 9 वर्षांत देशातील गाढवांची संख्या 61.23 टक्क्यांनी कमी झाल्याची माहिती देखील समोर आली आहे. ब्रुक इंडियाने केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन विभागाला दिलेल्या अहवालात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे(China steals Indian donkeys; China-Pakistan agreement for donkeys ).

    दिल्ली : भारतीय सीमा भागांवर घुसखोरी गेल्यानंतर चीनने आता भारतीय गाढवे चोरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गेल्या 9 वर्षांत देशातील गाढवांची संख्या 61.23 टक्क्यांनी कमी झाल्याची माहिती देखील समोर आली आहे. ब्रुक इंडियाने केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन विभागाला दिलेल्या अहवालात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे(China steals Indian donkeys; China-Pakistan agreement for donkeys ).

    चीनमध्ये तयार होणाऱ्या इजियाओ या पारंपरिक औषधासाठी गाढवाच्या कातडीचा वापर केला जातो. त्यासाठी गाढवांची तस्करी करण्याचा प्रकार कुरापती चीनकडून केला जात आहे. यासाठी देशातील विविध राज्यांमधून गाढवांची तक्सरी करण्यात येत असून यामध्ये महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यांसह अनेक राज्यांचा समावेश आहे. यापूर्वी वाघांच्या अवयवांची तस्करी चीनमध्ये केली जात होती.

    गाढवांसाठी चीन पाकिस्तानचा करार

    पाकिस्तानमधून चीनला दरवर्षी सुमारे 80 हजार गाढवांची निर्यात केली जाते. यासाठी चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये करार करण्यात आला आहे. पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला गाढवांच्या निर्यातीमुळे मोठा फायदा होत असून पाकिस्तानमध्ये एका गाढवाच्या चामड्याची किंमत 15 ते 20 हजारांच्या घरात असल्याचे सांगण्यात येते. एवढेच नव्हे तर, पाकिस्तानमध्ये गाढवांचे आरोग्य नीट रहावे यासाठी विशेष रुग्णालयेही असून गाढवांची सर्वाधिक संख्या असणारा देश म्हणून पाकिस्तानचा समावेश आहे.