china taiwan fight

फेब्रुवारीत रशिया-युक्रेनच्या युद्धानंतर तैवानने आपल्या तयारीला देखील वेग आणला होता. हवाई सीमेचे उल्लंघन करणाऱ्या चिनी विमानांपासून संरक्षणासाठी तैवानने जुलैमध्येच अमेरिकेशी ८५५ कोटी रुपयांचा सौदा केला. तैवानकडे घातक शस्त्रे आहेत. शेंग-फेंग-३. हे सुपरसॉनिक अँटिशिप मिसाइल तैवानचे मोठे संरक्षण कवच आहे.

    नवी दिल्ली – पूर्व आशियाचा समुद्र तापू लागला आहे. चिनी ड्रॅगनने लहानसा शेजारी देश तैवानची नाकेबंदी करण्यास सुरुवात केली. चीनने तैवानच्या सागरी क्षेत्रात सर्वात मोठ्या वॉरगेमला सुरुवात केली. अमेरिकेतील संसदेच्या सभापती नॅन्सी पेलोसी यांच्या दौऱ्यानंतर राजकीय पारा वाढू लागला आहे. युद्धाचे ढग जमू लागले आहेत. ड्रॅगनच्या मनसुब्यांना ओळखून तैवानने आपल्या सुरक्षेसाठी अमेरिकन शस्त्रास्त्रांचे १.३४ लाख कोटींचे शस्त्रागार सज्ज ठेवले आहे.

    फेब्रुवारीत रशिया-युक्रेनच्या युद्धानंतर तैवानने आपल्या तयारीला देखील वेग आणला होता. हवाई सीमेचे उल्लंघन करणाऱ्या चिनी विमानांपासून संरक्षणासाठी तैवानने जुलैमध्येच अमेरिकेशी ८५५ कोटी रुपयांचा सौदा केला. तैवानकडे घातक शस्त्रे आहेत. शेंग-फेंग-३. हे सुपरसॉनिक अँटिशिप मिसाइल तैवानचे मोठे संरक्षण कवच आहे. तैवानने त्याला किलर वाॅर कॅरिअर शिप तुओ शिंग क्लासमध्ये तैनात आहे. २०१५ मध्ये तैवानच्या नौदलात सामील तुओ शिंगवर तैनात दोन हजार नौदल सीमेवरून गस्त घालतात.

    चीन आधी क्षेपणास्त्र हल्ला करेल, नंतर कूच तैवानी नौदलाचे माजी अॅडमिरल ली साई मिन व माजी अॅडमिरल एरिक ली यांनी एक दावा केला आहे. चीनचे अनेक दशकांपासून तैवानवर ताबा मिळवण्याचे मनसुबे आहेत. म्हणूनच तैवानने चीनचा सामना करण्यासाठी गेल्या दहा वर्षांत आपले सैन्य मजबूत करण्यास सुरुवात केली. त्यानंतरच जलमार्गे हल्ल्याचा प्रयत्न होईल. सर्वात शेवटी लष्कर मैदानात उतरवेल.

    ६४ हजार कोटींचे ६६ लढाऊ जेट -ातैवानने २०१९ मध्ये अमेरिकेकडून ६४ हजार कोटी रुपयांचे ६६ एफ-१६ लढाऊ जेटचा जगातील सर्वात मोठा खरेदी सौदा केला होता. -तैवानची लोकसंख्या अडीच कोटी आहे. चीनच्या १४० कोटी लोकसंख्येच्या तुलनेत १.७९ टक्के आहे. संरक्षण बजेट ७ टक्के आहे. -१९५४, १९५८, १९९५ मध्ये चीनने तैवानच्या जलक्षेत्रात घुसखोरीचे प्रयत्न केले. परंतु चीनला माघार घ्यावी लागली होती.