चीन- अमेरिका तणाव वाढला; लढाऊ विमाने तैवानमध्ये घुसवली

विरोध असतानाही अमेरिकेच्या नॅन्सी पेलोसी तैवान दौऱ्यावर आल्या आहेत. त्यामुळे चीनने संताप व्यक्त केला आहे. अमेरिकेच्या या कृतीला जशास तसे उत्तर देऊ. तैवानमध्ये नॅन्सी पेलोसी यांनी पाऊल ठेवल्यास तैपेई विमानतळ बॉंबने उडवून देऊ, अशी धमकी चीनने अमेरिकेला दिली होती.

    तैपेई : अमेरिकन संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी (Nancy Pelosi) यांच्या तैवान (Taiwan) भेटीमुळे चीन (China) संतप्त झाला आहे. तसेच, अमेरिकेला (USA) याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला आहे. २१ चिनी लष्करी विमानांनी एअर डिफेन्स आयडेंटिफिकेशन झोन (ADIZ) मध्ये प्रवेश केला. यादरम्यान चीनने आपले केजे ५०० (KJ500) विमान आणि जेएफ (JF16), जेएफ (JF11), वाय ९ इडब्ल्यू (Y9 EW) आणि वाय८ एलिंट (Y8 ELINT) विमान तैनात केले होते.

    विरोध असतानाही अमेरिकेच्या नॅन्सी पेलोसी तैवान दौऱ्यावर आल्या आहेत. त्यामुळे चीनने संताप व्यक्त केला आहे. अमेरिकेच्या या कृतीला जशास तसे उत्तर देऊ. तैवानमध्ये नॅन्सी पेलोसी यांनी पाऊल ठेवल्यास तैपेई विमानतळ बॉंबने उडवून देऊ, अशी धमकी चीनने अमेरिकेला दिली होती. आता नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान दौऱ्याला प्रत्युत्तर म्हणून चीन लष्करी कारवाई करण्याच्या तयारीत आहे. चायनिज पीपल्स लिबरेशन आर्मी हाय अलर्टवर असून त्यांना कधीही हल्ल्याचा आदेश येण्याची शक्यता आहे.

    तैवानच्या प्रसारमाध्यमांनी पेलोसीच्या तैपेईमध्ये आगमनाची बातमी देताच, चीनच्या अधिकृत सोशल मीडियाने तैवानकडे मोठ्या प्रमाणावर लष्करी हालचाली केल्याचे सांगितले. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी बीजिंगमध्ये सांगितले की, आम्ही पेलोसीच्या कार्यक्रमाचे बारकाईने निरीक्षण करत आहोत. जर त्यांनी तैवानला प्रवास केला तर आम्ही त्याचे प्रत्युत्तर देऊ, असे म्हटले आहे.