चीनच्या कुरापती पुन्हा वाढल्या ; LAC वर ५० हजारांहून अधिक जवान तैनात ; ड्रोनच्या माध्यमातून नजर

चीनने पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर आपल्या हद्दीत ५० हजारांहून अधिक सैनिक तैनात केले असून ड्रोनच्या माध्यमातून भारतीय लष्करावर लक्ष ठेवण्यासाठी भारतीय चौक्यांजवळ उडविण्यात येत आहेत. अधिकृत सूत्रांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की पीपल्स लिबरेशन आर्मीच्या ड्रोन हालचाली बहुतेक दौलत बेग ओल्डी सेक्टर, गोगरा हाइट्स आदी भागात दिसत आहेत.

    बीजिंग : चीनच्या कुरापती पुन्हा सुरु झाल्या आहेत. त्यांनी आता LAC वर ५० हजारांहून अधिक जवान तैनात करत त्यांच्यावर ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवली जात आहे.चीनच्या या भूमिकेमुळे सीमेवर पुन्हा तणाव वाढला आहे.

    चीनने पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर आपल्या हद्दीत ५० हजारांहून अधिक सैनिक तैनात केले असून ड्रोनच्या माध्यमातून भारतीय लष्करावर लक्ष ठेवण्यासाठी भारतीय चौक्यांजवळ उडविण्यात येत आहेत. अधिकृत सूत्रांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की पीपल्स लिबरेशन आर्मीच्या ड्रोन हालचाली बहुतेक दौलत बेग ओल्डी सेक्टर, गोगरा हाइट्स आदी भागात दिसत आहेत. चीनच्या या कृत्यानंतर भारतीय लष्कर खूप सावध असल्याचे सूत्रांनी सांगितले. ते मोठ्या प्रमाणावर ड्रोन तैनात करत आहे. लवकरच ते आपल्या ताफ्यात नवीन इस्रायली आणि भारतीय ड्रोन दाखल करण्यार आहे. सीमेवर चीनच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी सुरक्षा दलांनी हे ड्रोन घेतले आहेत.