ख्रिस हिपकिन्स न्यूझीलंडचे नवे पंतप्रधान, गव्हर्नर जनरल यांनी दिली शपथ

44 वर्षीय ख्रिस हिपकिन्स 2008 मध्ये पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले होते. पंतप्रधान होण्यापूर्वी ते पोलिस, शिक्षण आणि लोकसेवा मंत्री होते. जेसिंडा आर्डर्न यांच्या राजीनाम्यानंतर ख्रिस पंतप्रधान झाले आहेत. मात्र, ते या पदावर किती काळ राहतील याची माहिती मिळालेली नाही. कारण न्यूझीलंडमध्ये ऑक्टोबर 2023 मध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत.

    नवी दिल्ली – न्यूझीलंडचे नवे पंतप्रधान ख्रिस हिपकिन्स हे बनले आहेत. राजधानी वेलिंग्टन येथे आज झालेल्या एका अधिकृत समारंभात गव्हर्नर जनरल सिंडी किरो यांनी त्यांना शपथ दिली. ख्रिस यांना लेबर कॉकसने औपचारिकपणे मान्यता दिली. यानंत ते पंतप्रधान होण्यासोबतच लेबर पार्टीचे नेतेही बनले आहेत. नवीन पंतप्रधानपदाच्या शर्यतीत ते एकमेव उमेदवार होते.

    कोरोनामध्ये चांगले काम करून छाप पाडली
    ख्रिस म्हणाले की,ही माझ्यासाठी खूप मोठी जबाबदारी आहे. मी पुढे येणारी आव्हाने आणि जबाबदाऱ्या स्वीकारण्यास तयार आहे. न्यूझीलंडमध्ये लेबर पार्टी 2017 पासून सत्तेत आहे. त्यामुळे सत्तेविरोधी लहर खूप जास्त आहे. बीबीसीच्या म्हणण्यानुसार, न्यूझीलंड सध्या महागाई आणि सामाजिक समानतेशी झुंजत आहे. त्यामुळे लेबर पार्टीच्यालोकप्रियतेत लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे ख्रिस यांच्यासमोर मोठे आव्हान असणार आहे.

    2008 मध्ये पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले
    44 वर्षीय ख्रिस हिपकिन्स 2008 मध्ये पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले होते. पंतप्रधान होण्यापूर्वी ते पोलिस, शिक्षण आणि लोकसेवा मंत्री होते. जेसिंडा आर्डर्न यांच्या राजीनाम्यानंतर ख्रिस पंतप्रधान झाले आहेत. मात्र, ते या पदावर किती काळ राहतील याची माहिती मिळालेली नाही. कारण न्यूझीलंडमध्ये ऑक्टोबर 2023 मध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. ख्रिस हिपकिन्स यांना महामारीचा सामना करण्यासाठी 2020 मध्ये कोविड मंत्री करण्यात आले होते. त्यादरम्यान ख्रिसच्या कामाचे जगभरात कौतुक झाले. कोरोना महामारीच्या 3 वर्षांत न्यूझीलंडमध्ये केवळ 2 हजार 437 मृत्यूची नोंद झाली.