Citizens are forcibly confined to a closed iron cage on suspicion of being a Corona patient. Imprisonment in 2 crore civilian homes

चीनने वाढच्या कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी झिरो कोविड पॉलिसी म्हणजेच शून्य कोरोना धोरण अवलंबिले आहे. हे धोरण अमंलात आणण्यासाठी चीनमध्ये सामान्य नागरिकांवर भयानवक अत्याचार करण्यात येत आहेत. याचे एक उदाहरण शांक्सी प्रांतातील शियान या शहरात पाहायला मिळते आहे. इथे क्वारंटाईन सेंटरच्या नावाखाली, नागरिकांना लोखंडी पिंजऱ्यात बंद करण्यात येते आहे. आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दिलेल्या या वृत्तानंतर संपूर्म जगात चिंता पसरली आहे(Citizens are forcibly confined to a closed iron cage on suspicion of being a Corona patient. Imprisonment in 2 crore civilian homes).

  शियान : चीनने वाढच्या कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी झिरो कोविड पॉलिसी म्हणजेच शून्य कोरोना धोरण अवलंबिले आहे. हे धोरण अमंलात आणण्यासाठी चीनमध्ये सामान्य नागरिकांवर भयानवक अत्याचार करण्यात येत आहेत. याचे एक उदाहरण शांक्सी प्रांतातील शियान या शहरात पाहायला मिळते आहे. इथे क्वारंटाईन सेंटरच्या नावाखाली, नागरिकांना लोखंडी पिंजऱ्यात बंद करण्यात येते आहे. आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दिलेल्या या वृत्तानंतर संपूर्म जगात चिंता पसरली आहे(Citizens are forcibly confined to a closed iron cage on suspicion of being a Corona patient. Imprisonment in 2 crore civilian homes).

  वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, गर्भवती महिला, लहान मुले आणि वयस्कर व्य्क्तिंना या बंद पिंजऱ्यात ठेवण्यात येते आहे. शहराच्या एखाद्या परिसरात कोरोना संक्रमित किंवा संशयित सापडला तर त्याला पकडून आणून या लोखंडाच्या बंद पिंजऱ्यात टाकण्यात येते. काही परिसरात तर अर्ध्या रात्री अशा संशयित किंवा कोरोना संक्रमितांना अशा क्वारंटाईन सेंटर्समध्ये जबरदस्तीने पाठवण्यात येते आहे.

  दोन कोटी नागरिक घरांमध्ये कैद

  चीनमध्ये ट्रॅक आणि ट्रेस रणनीती अंतर्गत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेत त्यांनाही क्वारंटाईन सेंटर्समध्ये पाठवण्यात येते आहे. सध्या चीनमधील २ कोटी जणांना त्यांच्या घरातच कैदेत ठेवण्यात आले आहे. खाण्यापिण्याच्या वस्तू आणण्यासाठीही त्यांना बाहेर जाण्यास परवानगी नाही.

  बिजिंगमध्ये सुरुये विंटर ऑलिम्पिकची तयारी

  चीन पुढील महिन्यात होणाऱ्या विंटर ऑलिम्पिकची तयारी करतो आहे. यामुळे सर्वसामान्य व्यक्तींवर जास्त कठोर नियम लावण्यात येत आहेत. अनेक ठिकाणी कैदेत असणाऱ्यांच्या घरातील खाण्यापिण्याच्या वस्तूही संपल्या आहेत. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून असे नागारिक मदतीसाठी आवाहन करीत आहेत.

  दोन ऑमायक्रॉनचे रुग्ण सापडल्यानंतर ५५ लाख जणांना केले कैद

  कोरना नियंत्रणमासाठी चीन सरकारने कठोर पावले उचलली आहेत. अनयांग शहरात २ ओमायक्रॉनचे रुग्ण सापडल्यानंतर, संपूर्म शहरात लॉकडाऊन लावण्यात आला आहे. या शहाराची लोकसंख्या ५५ लाख आहे. त्यापूर्वी १ कोटी ३० लाख लोकसंख्या असलेल्या शिआन शहरातही लॉकडाऊन लावण्यात आले होते. सध्या तीनमध्ये १.९६ कोटी लोकसंख्या ही लॉकडाऊनमध्ये आहे. कोविड तपासणीसाठी आणि कोरोना आटोक्यात आणण्यासाठी ही उपराययोजना करण्यात आली आहे.

  हे सुद्धा वाचा
  • 2022