Connection to the Peasant Movement - Sikh for Justice's plot against India; Donation to the United Nations

शीख समुदायाकडून 13 लाख डॉलर देणगी देण्याचा संकल्प आहे. जेणेकरून संयुक्त राष्ट्र संघाकडून चौकशी आयोगाची स्थापना केली जाईल. या आयोगाकडून भारतात आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांविरोधात देशद्रोह आणि हिंसाचाराच्या आरोपांची चौकशी करेल, असे अमेरिकेत राहणारे गुरपतवंत सिंग यांनी सांगितले.

    लंडन : भारतात बंदी असलेल्या खलिस्तान समर्थक गट शीख फॉर जस्टिसबाबत मोठा खुलासा झाल्याने खळबळ उडाली आहे. संयुक्त राष्ट्र संघाला शीख फॉर जस्टिस या संघटनेकडून 10 हजार डॉलर (जवळपास सात लाख) देणगी देण्यात आली आहे.

    दिल्ली सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाविरोधात झालेल्या अत्याचाराविरोधात चौकशी करण्यासाठी शीख फॉर जस्टिसकडून दबाव टाकला जात असल्याची चर्चा आहे. देणगीबाबतच्या वृत्ताला संयुक्त राष्ट्र संघाच्या मानवाधिकाराचे उच्चायुक्तांनीही दुजोरा दिला आहे. आम्हाला एक मार्च रोजी शीख फॉर जस्टिसशी संबंधित असलेल्यांकडून 10 हजार डॉलरची ऑनलाइन देणगी मिळाली आहे. ज्या संस्था, संघटनांवर संयुक्त राष्ट्र संघाने बंदी घातली नाही, अशा संघटना, संस्थांकडून देणगी स्वीकारली जात असल्याचे ते म्हणाले.

    दरम्यान, शीख समुदायाकडून 13 लाख डॉलर देणगी देण्याचा संकल्प आहे. जेणेकरून संयुक्त राष्ट्र संघाकडून चौकशी आयोगाची स्थापना केली जाईल. या आयोगाकडून भारतात आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांविरोधात देशद्रोह आणि हिंसाचाराच्या आरोपांची चौकशी करेल, असे अमेरिकेत राहणारे गुरपतवंत सिंग यांनी सांगितले.

    भारत सरकारने खलिस्तान समर्थक गुरपतवंत सिंगला दहशतवादी घोषित केले आहे. गुरपतवंत सिंग हा शीख फॉर जस्टिस संघटनेचा महासचिव आहे. खलिस्तानच्या मुद्यावर गुरपतवंत सिंग जनमत घेत आहे. त्याने सांगितले की, संयुक्त राष्ट्राने आतापर्यंत चौकशी आयोगाची स्थापना केली नसल्याची माहिती आहे. मात्र, आम्ही हे संपूर्ण प्रकरण संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकारासाठी असलेल्या उच्चायुक्त कार्यालयाद्वारे उचलण्याचा प्रयत्न करत आहोत.