प्रेषितांबद्दल आक्षेपार्ह विधानामुळे वाद ही भारताची ‘अंतर्गत बाब’

बांगलादेशने या मुद्यावर प्रतिक्रिया न दिल्याने टीका झाली होती. याबाबत भारतीय पत्रकारांसमोर स्पष्टीकरण देताना हसन मेहमूद म्हणाले, की वादग्रस्त विधान करणाऱ्यांवर तक्रार दाखल झाली असून त्यांच्यावर योग्य ती कारवाई होईल, असा आम्हाला विश्‍वास आहे. संबंधित वाद ही भारताची अंतर्गत बाब असल्याने सरकारकडून प्रतिक्रिया दिली गेली नाही.

    भाजप(BJP)च्या दोन माजी नेत्यांनी प्रेषित महंमद यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे (Offensive statement) निर्माण झालेला वाद ही भारताची ‘अंतर्गत बाब’ (Internal Matter) असल्याचे बांगलादेश(Bangladesh)ने स्पष्ट केले. बांगलादेशमध्ये या मुद्द्याला फारसे महत्त्व दिले गेले नसल्याचे बांगलादेशचे माहिती आणि प्रसारण मंत्री हसन मेहमूद (Hasan Mahmud) यांनी सांगितले. भाजप(BJP)च्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) आणि नवीनकुमार जिंदाल (Navinkumar Jindal) यांनी प्रेषितांविरोधात केलेल्या वक्तव्यावरून अनेक मुस्लीम संघटनां(Muslim Communittee)नी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली असून काही मुस्लीम देशांनीही निषेध (Prohibition) व्यक्त केला आहे.

    बांगलादेशने या मुद्यावर प्रतिक्रिया न दिल्याने टीका झाली होती. याबाबत भारतीय पत्रकारांसमोर स्पष्टीकरण देताना हसन मेहमूद म्हणाले, की वादग्रस्त विधान करणाऱ्यांवर तक्रार दाखल झाली असून त्यांच्यावर योग्य ती कारवाई होईल, असा आम्हाला विश्‍वास आहे. संबंधित वाद ही भारताची अंतर्गत बाब असल्याने सरकारकडून प्रतिक्रिया दिली गेली नाही.

    बांगलादेशमधील काही कट्टरतावादी गटही भारताविरोधात बोलत असतात. कधी तरी या विधानांना भारतीय माध्यमांमध्ये ठळक स्थान मिळते. मात्र, हा सर्व अंतर्गत राजकारणाचा परिणाम असतो, याची जाणीव भारत आणि बांगलादेश सरकारला आहे. आमचे संबंध चांगले असून एकमेकांमध्ये सामंजस्य आहे, असेही हसन मेहमूद म्हणाले.