बापरे बाप ! ब्राझीलमध्ये कोरोना रुग्णांचे भयंकर हाल, बेड न मिळाल्याने होतायत खुर्चीवर ऍडमिट

ब्राझीलमध्ये कोरोनाचा फैलाव अत्यंत वेगानं व्हायला सुरुवात झालीय. सध्या ब्राझीलसारख्या प्रगत देकोरशातही सार्वजनिक आरोग्य सुविधेचे तीनतेरा वाजल्याचं चित्र बघायला मिळतंय. अनेक कोरोना रुग्णांना सध्या बेडच उपलब्ध नाहीत. त्यामुळे अक्षरशः खुर्चीवर बसून रुग्णांना कोरोनावरचे उपचार घ्यावे लागत आहेत.

    कोरोनाचा फटका जगातील श्रीमंत देशांना मोठ्या प्रमाणावर बसलाय. अमेरिकेखालोखाल यात नंबर लागतो ब्राझीलचा. ब्राझीलमध्ये सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं अक्षरशः धुमाकूळ घातलाय. कोरोना इतक्या वेगानं ब्राझीलमध्ये पसरू लागलाय, की तिथल्या आरोग्य सुविधादेखील कमी पडू लागल्या आहेत.

    ब्राझीलमध्ये कोरोनाचा फैलाव अत्यंत वेगानं व्हायला सुरुवात झालीय. सध्या ब्राझीलसारख्या प्रगत देकोरशातही सार्वजनिक आरोग्य सुविधेचे तीनतेरा वाजल्याचं चित्र बघायला मिळतंय. अनेक कोरोना रुग्णांना सध्या बेडच उपलब्ध नाहीत. त्यामुळे अक्षरशः खुर्चीवर बसून रुग्णांना कोरोनावरचे उपचार घ्यावे लागत आहेत.

    ब्राझीलमध्ये आतापर्यंत १ कोटी २४ लाख इतके नवे रुग्ण आढळले आहेत. तर ३ लाख १० हजारांपेक्षा अधिक जणांना कोरोनामुळं मृत्यू झालाय. कोरोनाची स्थिती अत्यंत भयावह झालीय आणि आरोग्य यंत्रणेच्या मर्यादा उघड्या पडल्या आहेत. जगभरातले सर्वाधिक ऍक्टिव्ह रुग्ण सध्या ब्राझीलमध्ये आहेत, तर सर्वाधिक मृत्युंची संख्यादेखील ब्राझीलमध्येच आहे. ब्राझीलमधील २६ पैकी १६ राज्यांमध्ये आरोग्य सुविधांचे हाल होत असून त्यामुळे रुग्णांना वेळेत आणि योग्य उपचार मिळत नसल्याचं चित्र आहे.

    रुग्णालयांमध्ये सतत रुग्ण येत असून स्मशानभूमीबाहेरही मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय.