कोरोनाचा विस्फोट! फ्रान्समध्ये एका दिवसात आढळले सव्वा लाख बाधित

फ्रान्समधील शहर मर्से रुग्णालयाचे प्रमुख डॉ. ज्युलियन कार्वेली यांनी म्हटले की, रुग्णालयात दाखल होणाऱ्यांमध्ये बहुतांशी जणांनी लस घेतली नाही. फ्रान्समध्ये शनिवारी एक लाख ४ हजार ६११ कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. एकाच दिवसातील ही सर्वाधिक बाधितांची संख्या आहे.

    जगभरात कोरोना महामारीने पुन्हा एकदा जोर पकडण्यास सुरुवात केली आहे. त्यातच आता दक्षिण आफ्रिकेत आढळलेला कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन जगातील अनेक देशांमध्ये फैलावला आहे. ओमिक्रॉनमुळे ब्रिटन, फ्रान्स, इटलीमध्ये बाधितांची उच्चांकी नोंद होत आहे.

    फ्रान्समध्ये एका दिवसात सव्वा लाख बाधित

    फ्रान्समध्ये कोरोनाने हाहाकार पसरविला आहे . एकाच दिवसात फ्रांसमध्ये जवळपास सव्वा लाख कोरोनाबाधित आढळल्यामुळे येथील प्रशासनाची चिंता वाढली आहे. दरम्यान फ्रान्स व इतर देशांमध्ये बाधितांची संख्या वाढत असली, तरी दिलासादायक गोष्ट म्हणजे मृतांची संख्या कमी आहे.

    लसीकरणावर भर
    फ्रान्समधील शहर मर्से रुग्णालयाचे प्रमुख डॉ. ज्युलियन कार्वेली यांनी म्हटले की, रुग्णालयात दाखल होणाऱ्यांमध्ये बहुतांशी जणांनी लस घेतली नाही. फ्रान्समध्ये शनिवारी एक लाख ४ हजार ६११ कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. एकाच दिवसातील ही सर्वाधिक बाधितांची संख्या आहे. फ्रान्समधील फक्त ७६ टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या संभाव्य धोक्याला फ्रान्स सरकारने अधिक गंभीरपणे घेतले असून दोन डोस घेतलेले नागरिक तीन महिन्यानंतर बुस्टर घेऊ शकतात, असे सरकारने म्हटले आहे.