चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक; स्मशानभूमीत लांबच लांब रांगा, शाळांना ऑनलाइन वर्ग

    कोरोना या रोगाचे नाव जरी कोमी घेतल की आपल्या भिती वाटल्याशिवाय राहत नाही. आज ही चीन देशमध्ये कोरोना चे संक्रमण झाल्याचे दिसून येत नाही. कोरोना विषाणूच्या आगमनानंतर आता दोन वर्षांनी चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. चीनची राजधानी बीजिंगमध्ये कोविड प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. बीजिंगच्या स्मशानभूमीत शनिवारी कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या अंत्यसंस्कारासाठी हाणामारीसारखी परिस्थिती निर्माण झाली. शांघायने कोविडची प्रकरणे वाढल्यामुळे त्यांच्या बहुतेक शाळांना ऑनलाइन वर्ग घेण्याचे आदेश दिले आहेत. शांघायच्या एज्युकेशन ब्युरोनुसार सोमवारपासून नर्सरी आणि चाइल्ड केअर सेंटर देखील बंद होतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

    याआधी चीनने देशातील कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी शून्य कोविड धोरण अवलंबले होते. मात्र राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या या धोरणाविरोधात देशात मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली. त्यांनतर चीनने एका आठवड्यापूर्वी अचानक आपला कोविड व्यवस्थापन प्रोटोकॉल बदलला. 1.4 अब्ज लोकांना सांगितले आहे की, गंभीर लक्षणे असलेल्या लोकांनी घरातच राहावे आणि सौम्य लक्षणांसाठी स्वत: ची काळजी घ्यावी.

    यूएस-आधारित इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्युएशन (IHME) च्या नवीन अंदाजानुसार, चीनच्या कठोर COVID-19 निर्बंधांमुळे देशात कोरोनाव्हायरस संसर्गाचा स्फोट होऊ शकतो आणि 2023 पर्यंत 1 लाखांहून अधिक मृत्यू होऊ शकतात.