फ्रान्समध्ये आढळला नव्या कोरोनाचा रुग्ण, वेगाने होऊ शकतो संसर्ग

ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा(new variant of corona) नवीन प्रकार समोर आला. त्यानंतर फ्रान्समध्ये या नव्या प्रकारच्य कोरोनाचा पहिला रुग्ण (first case in france)सापडला असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा(new variant of corona) नवीन प्रकार समोर आला. त्यानंतर फ्रान्समध्ये या नव्या कोरोनाचा  पहिला रुग्ण (first case in france)सापडला असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. कोरोनाचा हा नवा प्रकार अनेक देशांसाठी चिंतेची बाब ठरली आहे. याच पार्श्वभूमीवर ५० हून अधिक देशांनी ब्रिटनमधील वाहतुकीवर निर्बंध आणले आहेत.

दरम्यान फ्रान्समधील हा पहिला रुग्ण ब्रिटनमध्ये राहत होता, अशी माहिती मिळाली आहे. लंडन येथून १९ डिसेंबरला तो परत आला होता. या रुग्णामध्ये कोणतीही लक्षणं जाणवलेली नाहीत. तो फ्रान्समधील आपल्या घऱात विलगीकरणात असल्याची माहिती मंत्रालयाने दिली आहे. त्या माणसाची २१ डिसेंबरला वैद्यकीय तपासणी केली असताना त्याला नव्या प्रकारच्या कोरोनाची लागण झाली असल्याचे समजले.

फ्रान्समध्ये कोरोना रुग्णांच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगला सुरुवात झाली आहे.