Corona positive found in 21 coroners from UK

ब्रिटनहून आलेले प्रवासी भारतातील वेगवेगळ्या राज्यातील आहेत. तसेच हे प्रवासी दिल्ली, चेन्नई, अमृतसर कोलकाता आणि अहमदाबाद या विमानतळांवर उतरले आहेत. हे प्रवासी कोरोनाबाधित आढळल्याने प्रशासनाने कॉन्टॅक्ट ट्रेसिंगला सुरुवात केली आहे.

मुंबई : ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा प्रकोप वाढला आहे. त्यामुळे जगातील सर्वच देशांची चिंता वाढली आहे. भारतासह अनेक देशांनी युरोपातून येणाऱ्या सर्व विमान सेवांना बंदी घातली आहे. कालच ब्रिटनहून एअर इंडियाच्या विमानातून भारतात आलेले २१ प्रवासी कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे चिंतेत भर पडली आहे.

ब्रिटनहून आलेले प्रवासी भारतातील वेगवेगळ्या राज्यातील आहेत. तसेच हे प्रवासी दिल्ली, चेन्नई, अमृतसर कोलकाता आणि अहमदाबाद या विमानतळांवर उतरले आहेत. हे प्रवासी कोरोनाबाधित आढळल्याने प्रशासनाने कॉन्टॅक्ट ट्रेसिंगला सुरुवात केली आहे.

सगळ्यात धक्कादायक बाब अशी आहे की, ब्रिटनहून भारतात दाखल झालेले सर्व प्रवासी ब्रिटनमधील नव्या कोरोनाच्या स्ट्रेनने कोरोनाबाधित झाले आहेत का नाही? याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही. परंतु कोरोनाबाधित आढळलेल्या सर्व रुग्णांचे नमुने पुण्यातील नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ वायरोलॉजीकडे चाचणीसाठी पाठविण्यात आले आहे.

कोरोनाबाधित आढळलेल्या विमानातून एकून २५० प्रवासी भारतात दाखल झाले आहेत. यामध्ये एक वैमानिकही कोरोनाबाधित आढळला आहे. यात अमृतसरमधील ८ तर दिल्ली विमानतळावर ५, अहमदाबादमध्ये ४, कोलकाता २ चेन्नईत १ प्रवासी कोरोना बाधित आढळले आहेत.