चीनमध्ये कोरोनाने हाहाकार; रुग्णालयामध्ये जागा नाही, औषधं संपली, उपचारासाठी डॉक्टरांपुढे पसरावे लागतायेत हात, ८० कोटी बाधित होण्याची शक्यता

गेल्या एका आठवड्यात जगभरात कोरोना रुग्णांची संख्या ३५ लाखांपर्यंत पोहचली आहे तर ९ हजार ८२८ जणांचा मृत्यू कोरोनानं झाल्याचं सांगण्यात येतयं. चीनमध्ये गेल्या सात दिवसांत सुमारे १६ हजार रुग्ण आणि सात रुग्णांचा मृत्यू झआल्याचं सांगण्यात येतंय.

    बिजिंग – चीनमध्ये (China Corona) कोरोना संसर्गाची भीतीदायक स्थिती निर्माण झालेली आहे. येत्या काही महिन्यांत चीनमधील ८० कोटी जमांना कोरोनाची लागण होण्याची भीती वर्तवण्यात येते आहे. झिरो कोविड पॉलिसी संपल्यानंतर लगेचच २१ लाख जणांचा मृत्यू होण्याची भीती लंडनच्या ग्लोबल हेल्थ इंटेलिजन्स कंपनी एयरफिनिटीने वर्तवली आहे. २०२० सालाची आठवण चीनच्या स्थितीनं येतेय. चीनमधील सगळी हॉस्पिटल्स सध्या ओसंडून वाहातना दिसतायते.

    रुग्णालयात उपचारासाठी रुग्णांची तुफान गर्दी

    मेडिकलमध्ये औषधांसाठी मारामार

    कोरोनाच्या भीषणतेची दाहकता दाखवणारं एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. मेडिकलच्या दुकानांमधील औषधे संपलेली आहेत. रुग्ण उपचारांसाठी डॉक्टरांपुढे गयावाया करतानाचं चित्र आहे.  त्यामुळे लहान मुलांना आलेला ताप कमी करण्यासाठी पारंपरिक उपाययोजना घराघरात करण्यात येताना दिसत आहेत.

     

    बिजिंमध्ये स्मशानभूमीतही वर्दळ

    बिजिंगमध्ये असलेलं सर्वात मोठं स्मशान २४ तास वर्दळीचं ठिकाण झालंय. त्यामुळे सामूहिक अंत्यसंस्कार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. त्याचे काही व्हिडीओ आणि फोटोही व्हायरल होताना दिसतायेत. सरकारी आकडेवारीनुसार मात्र दररोज ४ ते ५ रुग्णांचा मृत्यू होत असल्याचं सांगण्यात येत असलं तरी प्रत्यक्षात हा आकडा फार मोठा असल्याची भीती वर्तवण्यात येतेय. एक रुग्म साधारण १८ जणांना कोरोनाची लागण करतो आहे. हा एमिक्रॉनचा सर्वाधिक धोकादायक म्युटेशन असल्याचं सांगण्यात येतंय.

     

    कोरोनापासून बचावासाठी नागरीक आवश्यक त्या सगळ्या उपाययोजना करताना दिसत आहेत.

    जगभरात ७ दिवसांत ३५ लाख कोरोना रुग्ण

    गेल्या एका आठवड्यात जगभरात कोरोना रुग्णांची संख्या ३५ लाखांपर्यंत पोहचली आहे तर ९ हजार ८२८ जणांचा मृत्यू कोरोनानं झाल्याचं सांगण्यात येतयं. चीनमध्ये गेल्या सात दिवसांत सुमारे १६ हजार रुग्ण आणि सात रुग्णांचा मृत्यू झआल्याचं सांगण्यात येतंय. मात्र रुग्णांचा मूळ आकडा चीन सरकार लपवत असण्याची शक्यता आहे. जपान, द. कोरिया आणि फ्रान्समध्येही रुग्णसंख्या मोठी आहे.