The danger increased even more; Corona becomes 'Delta Plus'

कोरोना निर्बंध मुक्तीकडे वाटचाल करीत असलेल्या ब्रिटनला डेल्टा वेरिएंटने जबर झटका दिला आहे. गेल्या सात दिवसांमध्ये ब्रिटनमध्ये 35 हजार करोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर, आतापर्यंत एक लाख 11 हजार 157 जणांना करोनाची लागण झाली आहे. मागील एक आठवड्यात डेल्टा वेरिएंटबाधितांची संख्या 46 टक्क्यांनी वाढली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. एकूण बाधितांपैकी ४२ जणांना डेल्टा प्लस या वेरिएंटची बाधा झाली आहे. काही भागांमध्ये याचा प्रसार होण्याची अधिक शक्यताही अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.

    लंडन : कोरोना निर्बंध मुक्तीकडे वाटचाल करीत असलेल्या ब्रिटनला डेल्टा वेरिएंटने जबर झटका दिला आहे. गेल्या सात दिवसांमध्ये ब्रिटनमध्ये 35 हजार करोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर, आतापर्यंत एक लाख 11 हजार 157 जणांना करोनाची लागण झाली आहे. मागील एक आठवड्यात डेल्टा वेरिएंटबाधितांची संख्या 46 टक्क्यांनी वाढली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. एकूण बाधितांपैकी ४२ जणांना डेल्टा प्लस या वेरिएंटची बाधा झाली आहे. काही भागांमध्ये याचा प्रसार होण्याची अधिक शक्यताही अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.

    देशात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे 51 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामधील सर्वाधिक म्हणजेच 22 रुग्ण महाराष्ट्रातील आहेत. हा व्हेरिएंट अधिक संक्रमक असल्याने तिसऱ्या लाटेचा धोका वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे आठ राज्यातील दहा जिल्ह्यांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. ज्या जिल्ह्यात डेल्टा प्लसचे रुग्ण आढळतील तेथे तात्काळ कंटेन्मेंट झोन तयार करावेत. संक्रमितांचे नमुने तातडीने सार्स-सीओव्ही-टू जीनोमिक कंन्सोर्टियाच्या प्रयोगशाळेत पाठवावेत. तसेच लोकांच्या हलचालींवर निर्बंध लावावेत, असे केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्यांच्या मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

    तामिळनाडुतील मदुराई येथे एका व्यक्तीचा कोरोना विषाणूच्या डेल्टा व्हेरिएंटमुळे मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. राज्यातील हे पहिलेच प्रकरण आहे. डेल्टा व्हेरिएंटचे तीन रुग्ण समोर आले होते त्यापैकी दोन बाधामुक्त झाले. डेल्टाव्हेरिएंटमुळे तामिळनाडूत 9 जण बाधित झाले आहेत.