
मलावीच्या आपत्ती व्यवस्थापन खात्याने सांगितले की, चक्रीवादळामुळे 326 लोकांचा मृत्यू झाला आहे. उष्णकटिबंधीय वादळाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या विध्वंसामुळे वाचलेल्यांना अडकवले जाते आणि ते त्यांच्या अस्तित्वासाठी लढा देत आहेत.
सध्या वातवरणात वेगाने बदल होत असुन भारतात अनेक ठिकाणी गुरुवारी पावसाने हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. हे वातावरणातील बदल जगभरात होत असुन. दक्षिण-पूर्व आफ्रिकेत सध्या चक्रीवादळ फ्रेडीने (Cyclone Freddy) कहर केला आहे. या चक्रीवादळामुळे मलावीमध्ये 300 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. सीएनएनने भूपरिवेष्टित देशाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.
मलावीच्या आपत्ती व्यवस्थापन खात्याने सांगितले की, या चक्रीवादळामुळे 326 लोकांचा मृत्यू झाला आहे. उष्णकटिबंधीय वादळाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या विध्वंसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
अधिका-यांनी पुढे सांगितले की, चिलोब्वेमध्ये, सर्वात जास्त प्रभावित क्षेत्रांपैकी एक, 30 हून अधिक लोक ठार झाले आहेत आणि अनेक लोक बेपत्ता आहेत. शोध आणि बचावाचे प्रयत्न सुरू आहेत. सीएनएनशी बोलताना, एका महिलेने सांगितले की, तिला विमानासारखा खुप मोठा आवाज ऐकू आला त्यांनतर तिने अनेक लोकांना किंचाळताना पाहिले. त्यावेळी रात्रीचे 12 वाजले होते आणि मला वरून लोकांचा आरडाओरडा ऐकू आला. यानंतर खडक आणि झाडांसह गढूळ पाण्याचा प्रवाह डोंगरावरून खाली सरकू लागला. ज्यात त्याची सर्व मालमत्ता वाहून गेली. ती म्हणाली की आता सर्व काही संपले आहे. 2014 मध्येच माझ्या पतीचे निधन झाल्यामुळे मी भाजीविक्रीचा छोटा व्यवसाय करत होते. माझ्याकडे जे काही शिल्लक आहे ते घेऊन मी मुलांना वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, आता सगळं संपलय.
दरम्यान, हवामान खात्याच्या अहवालात म्हटले आहे की, जोरदार पूर आणि नुकसान करणाऱ्या वाऱ्यांचा धोका खूप जास्त आहे. याआधी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रेडी चक्रीवादळामुळे मलावी, मोझांबिक आणि मादागास्करमध्ये झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला होता. ते म्हणाले होते की भारत प्रभावित देशांच्या लोकांच्या कठीण काळात त्यांच्या पाठीशी उभा आहे.