ब्रिटनमध्ये सापडला कोरोनाचा धोकादायक स्ट्रेन; जाणून घ्या काय आहे?

ब्रिटनमध्ये (Britain) कोरोनाचा धोकादायक स्ट्रेन (Dangerous strain of corona found ) सापडल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे संपूर्ण जग धास्तावलं आहे.

जगात कोरोना विषाणूचा (Corona Virus) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तसेच काही देशानी लसीकरणास सुरूवात केली आहे. परंतु ब्रिटनमध्ये (Britain) कोरोनाचा धोकादायक स्ट्रेन (Dangerous strain of corona found ) सापडल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे संपूर्ण जग धास्तावलं आहे.

कोरोनाच्या नव्या स्ट्रेनला ब्रिटनच्या संशोधकांनी व्हीयूआय-२०२०१२/०१ असं नाव दिलं आहे. कोरोना विषाणूला अनेक टोक असतात. त्यातूनच तो माणसाला संक्रमित करतो. त्यानंतर त्याची साखळीच तयार होते आणि तो वेगानं पसरत जातो.

नवा स्ट्रेन कधी आणि कुठे सापडला?

नवा स्ट्रेन ब्रिटनमध्ये सप्टेंबर महिन्यात आढळून आला. नोव्हेंबरमध्ये लंडनमध्ये नव्या स्ट्रेननं बाधित झालेले काही रुग्ण सापडले. आतापर्यंत ११०० जणांना नव्या स्ट्रेनमुळे कोरोनाची लागण झाली आहे. ब्रिटनसह इटलीतही कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळून आला आहे. फ्रान्समध्येही या स्ट्रेननं शिरकाव केलेला असू शकतो, अशी शक्यता तिथल्या सरकारनं वर्तवली आहे. ब्रिटनहून ऑस्ट्रेलियात परतलेल्या दोघांमध्ये नवा स्ट्रेन आढळून आला आहे.