ना खंडणी, ना गँगवॉर, औषधांच्या तस्करीचा डी कंपनीचा व्यवसाय, चोरीचे मोबाईल पाकिस्तानात विकतायत दाऊदचे चमचे, बिल्डींग पाडण्याचं घेतायत कॉन्ट्रॅक्ट

आता डी कंपनी D Company) भारतातून औषधांची तस्करी, मोबाइल फोन चोरणे आणि बिल्डिंग पाडण्यासारखी काम करत आहे. असं असताना ड्रग्स आणि गोल्ड-सिल्वर तस्करी करणं हा त्यांचा आजही मूळ व्यवसाय आहे. आता दाऊद (Dawood Business) वेगळ्या व्यवयासातही उतरला आहे.

  अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Dawood) कासकर आजकाल त्याच्या दुसऱ्या लग्नामुळे चर्चेत आहे. मात्र एक गोष्ट अशी आहे ज्याची चर्चा सध्या कोणीही करत नाही. ही गोष्ट म्हणजे डी कंपनीचा (D Company) बदललेला व्यवसाय. कधी खंडणी, जमिनीवर ताबा, सेटलमेंट, ड्रग्स आणि स्मगलिंगच्या माध्यमातून दहशत पसरवणारा दाऊद आता एक वेगळाच धंदा (Business Of Dawood Gang) करत आहे.

  आता डी कंपनी भारतातून औषधांची तस्करी, मोबाइल फोन चोरणे आणि बिल्डिंग पाडण्यासारखी काम करत आहे. असं असताना ड्रग्स आणि गोल्ड-सिल्वर तस्करी करणं हा त्यांचा आजही मूळ व्यवसाय आहे. आता दाऊद वेगळ्या व्यवयासातही उतरला आहे. एनआयएच्या (NIA ) एका चार्जशीटनुसार पाकिस्‍तानच्या कराची एअरपोर्टवर दाऊद आणि त्याचे नातेवाईक चेक इन, चेक-आउट न करता प्रवास करतात.

  परिस्थिती बदलली, व्यवसाय बदलला
  NIA च्या अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं की, दाऊद हळुहळू स्वत:ला वाईट धंद्यांपासून दूर करतोय. D-कंपनीचं संपूर्ण काम भारताबाहेरून सुरु आहे. याच कारणामुळे 2001 नंतर मुंबईत कोणतंही गँगवॉर झालेलं नाही. D-कंपनीची माणसं आता जमीन आणि बिल्डिंग प्रोजेक्ट्समध्ये गुंतवणूक, मनी लॉन्ड्रिंग आणि ऑनलाइन सट्टेबाजीतून पैसे कमवत आहेत. खोट्या नोटा छापण्याचं कामही त्यांनी सुरु केलं आहे.

  दाऊद करतोय कॅन्सरच्या औषधांची तस्करी
  NIA सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार D-कंपनी भारतात तयार होणाऱ्या कॅन्सरवरील औषधांची तस्करी चीन आणि अन्य देशांमध्ये करत आहे. चीनमध्ये भारतीय औषधांची खरेदी-विक्री करण्यावर बंदी आहे. काही दिवसांपूर्वी एका चीनमधील माणसाला भारतीय औषधं खरेदी केल्याबद्दल 8 महीने जेल आणि 2,000 युआन (30 हजार रुपये) दंड ठोठावण्यात आला. ग्वांगडोंग प्रांतातही दोघांना भारतीय औषधांच्या व्यवहाराच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. चीनमध्ये भारतात तयार झालेल्या कॅन्सवरच्या अनेक औषधांना बनावट औषधं मानलं जातं.

  एका रिपोर्टनुसार चीनमध्ये कॅन्सरच्या एका पेशंटच्या औषधावर दरवर्षी 35 लाख रुपयांपर्यंत खर्च होतो. हा भारतापेक्षा 10 पट जास्त आहे. डी-कंपनी या गोष्टीचा फायदा घेत आहे.

  मुंबईतील एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, ‘चीनमध्ये असलेले एजंट भारतातील D-गँगशी निगडीत लोकांकडून औषधं घेतात. चीनमध्ये प्रत्येक 10 पैकी 6 रुग्ण भारतीय औषध वापरतात. तसेच 2018 मध्ये एअर इंटेलिजन्स युनिटने (AIU) 2018 मध्ये खलदून जौदा आणि तारमानिनी अली नावाच्या दोन सीरियन नागरिकांना 55 लाख रुपयांच्या कॅन्सरच्या औषधांंसकट अटक केली. ही औषधे आधी सीरिया आणि नंतर इतर देशांमध्ये दिली जाणार होती.

  डिसेंबर 2022 मध्ये सोनीपतमध्ये बनावट औषध बनवणार रॅकेट समोर आलं होतं. या प्रकरणात डॉक्टरसह 12 लोकांना अटक करण्यात आली. ते 4 वर्षांपासून बनावट औषधे चीन, बांग्लादेश आणि नेपाळला पाठवत होते. छापेमारीमध्ये 8 कोटींची औषधे जप्त करण्यात आली. यात डी कंपनीचा हात असण्याची शक्यता आहे.

  वरिष्ठ पत्रकार विवेक अग्रवाल मुंबई अंडरवर्ल्डवर गेल्या 37 वर्षांपासून नजर ठेऊन आहेत. त्यांनी दाऊद इब्राहिम आणि अंडरवर्ल्डवर 15 पेक्षा जास्त पुस्तक लिहिली आहेत. ते सांगतात की, D-कंपनीचे लोक प्रॉपर्टीमध्ये काळ्या पैशांची गुंतवणूक करत आहेत. इमारती पाडण्याचं काम करत आहेत. जुन्या इमारतींमध्ये लोखंड, पितळ, कांस्य, लाकूड आणि इतर मौल्यवान सामान असतं. दाऊदच्या माणसांची नजर मुंबई च्या जुन्या बिल्डिंगवर आहे. मुंबई हायकोर्टाने 48 इमारती पाडण्याचा आदेश दिला आहे. दाऊदची माणसं लोकांना धमकावून बिल्डींग पाडण्याचं कॉन्ट्रॅक्ट घेत आहेत. हे पाडण्याचे पैसे मिळतात. सामान बाहेर विकताही येतं. दाऊद आता थोडे वेगळे व्यवसाय करुन पैसे कमवत आहे. पूर्वी त्यांची दहशत होती. आता ती उरली नाही.