
डेंग्यू हा उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये आढळणारा रोग आहे आणि त्यामुळे जास्त ताप, डोकेदुखी, मळमळ, उलट्या, स्नायू दुखणे आणि सर्वात गंभीर प्रकरणांमध्ये रक्तस्त्राव होतो ज्यामुळे मृत्यू होऊ शकतो.
भारतात दरवर्षी डेंग्यूमुळे (Dengue) अनेक रुग्णांचा मृत्यू होतो. यावेळीही देशात अशीच परिस्थिती होती. भारताशिवाय शेजारी देश बांगलादेशही डेंग्यूने हैराण झाला आहे.बांगलादेशात या वर्षी डेंग्यूचे इतके रुग्ण आढळून आले की, गेल्या वर्षीचा विक्रमही मोडला आहे. त्याच्या एका अहवालानुसार, न्यूज चॅनेल अल जझीराने सांगितले की अधिकृत आकडेवारी दर्शवते की बांगलादेशात 2023 मध्ये डेंग्यू तापामुळे 1,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
बांगलादेशची काय स्थिती
अहवालानुसार, 2023 च्या पहिल्या नऊ महिन्यांत किमान बांगलादेशमध्ये आतापर्यंत 1,017 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि सुमारे 209,000 लोकांना संसर्ग झाला आहे. 2000 मध्ये पहिल्यांदा महामारी पसरल्यापासून ही आकडेवारी बांगलादेशातील डासांपासून पसरणाऱ्या आजाराची सर्वात मोठी आकडेवारी आहे. मृतांमध्ये 112 मुलांचाही समावेश आहे. यामध्ये लहान मुलांसह 15 वर्षे आणि त्यापेक्षा कमी वयाच्या लोकांचा समावेश आहे.
रूग्णालयात जागा नाही
सध्या बांगलादेशात डेंग्यू आजार झपाट्याने पसरत आहे. डेंग्यूच्या वाढत्या रुग्णांमुळे देशभरातील रुग्णालये रुग्णांसाठी पुरेशी जागा नसल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
डेंग्यू हा उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये आढळणारा रोग आहे आणि त्यामुळे जास्त ताप, डोकेदुखी, मळमळ, उलट्या, स्नायू दुखणे आणि सर्वात गंभीर प्रकरणांमध्ये रक्तस्त्राव होतो ज्यामुळे मृत्यू होऊ शकतो.
जागतिक आरोग्य संघटनेने इशारा दिला
डेंग्यूच्या रुग्णांची वाढती संख्या पाहता जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) इशारा दिला आहे. डब्ल्यूएचओने चेतावणी दिली आहे की डेंग्यू आणि डासांपासून पसरणारे इतर रोग, जसे की चिकनगुनिया, पिवळा ताप आणि झिका, हवामान बदलामुळे वेगाने पसरत आहेत.