Decision to close international flights to Fofavatoy Corona, Saudi Arabia

कोरोनाचा नवा प्रकार वेगाने पसरत असल्यामुळे जगातील अनेक देशांनी आंतररष्ट्रीय विमानसेवा बंद केली आहे. तसेच ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या रुपाने हाहाकार घातला असल्यामुले तेथील प्रवाशांना देशात प्रवेशबंदी कऱण्यात आली आहे. सौदीने आठवडाभरासाठी आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद केली आहे.

सौदी : ब्रिटनमध्ये कोरोनाचा प्रसार वाढत असल्यामुळे कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे सैदी अरेबियाने सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर आतरराष्ट्रीय विमान सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व आंतरराष्ट्रीय विमानसेवा सौदीमध्ये बंद ठेवण्यात आले आहेत. यामुळे कोरोना संसर्ग पुन्हा मोठ्या प्रमाणात पसरणार नाही. गरज पडल्यास पुढील आठवड्याभरासाठी विमानसेवा बंद ठेवण्यात येणार आहे. याबाबत सौदी अरेबीयाच्या (Saudi Arabia ) नागरी उड्डाण प्राधिकरणाने अधिसूनाही जारी केली आहे.

कोरोनाचा नवा प्रकार वेगाने पसरत असल्यामुळे जगातील अनेक देशांनी आंतररष्ट्रीय विमानसेवा बंद केली आहे. तसेच ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या रुपाने हाहाकार घातला असल्यामुले तेथील प्रवाशांना देशात प्रवेशबंदी कऱण्यात आली आहे. सौदीने आठवडाभरासाठी आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद केली आहे. त्यामुळे सौदीतील सर्व विदेशी विमानांना बाहेर जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.

सौदीत कोरोना परिस्थिती आटोक्यात आहे. आतापर्यंत सौदीमध्ये ३ लाख ६१ हजार कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर ६ हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सौदीने आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.