वर्णभेदाविरोधात लढणारे डेसमंड टुटू यांचे निधन

दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरील रामफोसा यांनी टूटू यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील ट्विटवर शोक व्यक्त केला आहे.

    दक्षिण आफ्रिकेचे संघर्ष नायक आणि माजी आर्चबिशप डेसमंड टूटू यांचे रविवारी निधन झाले. ते नव्वद वर्षांचे होते. त्यांनी आयुष्यभर वर्णभेदाविरोधात लढा दिला वर्णभेदाविरोधात अहिंसक लढा उभारल्याबद्दल त्यांना १९८४ मध्ये शांततेचा नोबेल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते.

    दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरील रामफोसा यांनी टूटू यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील ट्विटवर शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले, ”आर्चबिशप एमेरिटस डेसमंड टुटू हे जगभरातील असंख्य लोकांसाठी मार्गदर्शक दीपस्तंभ होते. मानवी सन्मान आणि समतेला त्यांनी दिलेले महत्त्व कायम स्मरणात राहील. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.”