भारत-चीन सीमेवरील स्थितीवर चर्चा; परराष्ट्र मंत्री जयशंकर यांची माहिती

पूर्व लडाखमधील लाईन ऑफ अॅक्च्युअल कन्ट्रोलवरील सध्याच्या प्रश्नांवर लवकरात लवकर तोडगा काढण्यात यावा, अशी मागणी परराष्ट्र मंत्रालयाकडून करण्यात आली आहे. जयशंकर म्हणाले, भारत-चीन संबंधांमध्ये तीन परस्पर संबंध महत्वाचे आहेत.

    बाली : परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) हे सध्या बालीच्या दौऱ्यावर (Bali Tour) आहेत. या ठिकाणी २० देशांच्या (G-20) परराष्ट्र मंत्र्यांची बैठक सुरु आहे. या बैठकीदरम्यान जयशंकर यांनी चीनने परराष्ट्र मंत्री वांग इन (Chinese Foreign Minister Wang Yi) यांची भेट झाली. तासभर चाललेल्या या बैठकीत भारत-चीन सीमेवरील (India-China Border) स्थितीबाबत महत्वपूर्ण चर्चा झाली.

    पूर्व लडाखमधील लाईन ऑफ अॅक्च्युअल कन्ट्रोलवरील (LAC) सध्याच्या प्रश्नांवर लवकरात लवकर तोडगा काढण्यात यावा, अशी मागणी परराष्ट्र मंत्रालयाकडून करण्यात आली आहे. जयशंकर म्हणाले, भारत-चीन संबंधांमध्ये तीन परस्पर संबंध महत्वाचे आहेत. यामध्ये परस्पर आदर, परस्पर संवेदनशीलता आणि परस्परांमधील रस या गोष्टी महत्वाच्या आहेत. सीमेवरील स्थितीबाबत द्वीपक्षीय संबंधांमध्ये सध्याचे ठराविक प्रश्नांवर लक्ष केंद्रीत केले आहे. त्याचबरोबर भारत आणि चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये विद्यार्थी आणि विमानसेवेसह आंतरराष्ट्रीय घडामोडींबाबत दोन्ही देशांना काय वाटत? याबाबतही चर्चा झाली.

    गेल्या काही महिन्यांपासून भारत-चीन सीमेवर बिजिंगकडून (Beijing) परस्पर संबंध रुळावर आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यानुसार, चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यीन यांनी यावर्षी मार्चमध्ये भारताला भेट दिली होती. पण या भेटीदरम्यान भारताने चीनला ठणकावले होते की, जोपर्यंत सीमावाद सोडवला जात नाही तोपर्यंत दोन्ही देशांमधील संबंध पूर्ववत होऊ शकत नाहीत.