woman marries to dog

युनायटेड किंगडममध्ये(United Kingdom) एका महिलेनं आपल्या पतीला घटस्फोट दिला. यानंतर तिनं पाळीव कुत्र्याला आपला जोडीदार म्हणून निवडलं (Divorced Woman Married With her Dog).

    नवी दिल्ली : नवरा – बायकोच्या घटस्फोटाची(Divorce) अनेक प्रकरणे तुम्ही पाहिली असतील. घटस्फोटानंतर दुसरं लग्न(Second Marriage After Divorce) करुन आयुष्याची नव्याने सुरुवात करणारेही कमी नाहीत. मात्र एखाद्याने पतीला सोडून आपल्या पाळीव प्राण्यासोबत लग्न केल्याचं ऐकलं आहे का ? तुम्हाला खोटं वाटत असेल पण युनायटेड किंगडममध्ये(United Kingdom) एका महिलेनं आपल्या पतीला घटस्फोट दिला. यानंतर तिनं पाळीव कुत्र्याला आपला जोडीदार म्हणून निवडलं (Divorced Woman Married With her Dog).

    अमांडा रोजर्स (Amanda Rodgers) असं या महिलेचं नाव आहे. अमांडाने २०१४ साली अगदी वाजतगाजत लग्न केलं होतं. यानंतर तिनं आपल्या डॉगी शेबाला आपला जोडीदार म्हणून निवडलं. महिला आता या मुक्या जीवासोबत इतकं चांगलं आयुष्य जगत आहे की इतक्या वर्षांच्या आधीच्या लग्नात ती इतकी आनंदी कधीच नव्हती.

    क्रोएशियामध्ये राहणारी अमांडा आपल्या पतीला घटस्फोट दिल्यानंतर एकटीच राहात होती. यानंतर एक दिवस तिनं आपला पाळीव श्वान शेबासोबत प्रथा-परंपरेनुसार लग्नगाठ बांधली. तिनं त्याच्यासोबत जगण्या-मरण्याची शपथ घेतली आणि किस करत त्याला आपला लाईफ पार्टनर मानलं. आता अमांडा रोजर्सचं म्हणणं आहे, की शेबा तिच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग आहे. शेबा तिला हसवते, आनंदी ठेवते आणि कठीण काळात तिला आधारही देते. शेबा तिला कधीच त्रास देत नाही आणि तिची विशेष काळजीही घेते. एका टीव्ही शोमध्ये बोलताना महिलेनं सांगितलं की शेबा २ महिन्यांची असतानाच मला तिच्यावर प्रेम झालं आणि अखेर आम्ही लग्न केलंच.

    मजेशीर बाब म्हणजे अमांडा सांगते की शेबाला या लग्नाबद्दलही माहिती आहे. कुत्र्याला आपला जोडीदार बनवण्यासाठी अमांडाने गुडघ्यावर बसून प्रपोज केलं होतं. याचं उत्तर कुत्र्याने आपली शेपटी हालवून हो असं दिलं होतं.