डोनाल्ड ट्रम्प पुन्हा अडचणीत! आता महिलेच्या छातीवर दिला ऑटोग्राफ, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वादाला फुटलं तोंड

यापुर्वी ट्रम्पवर अमेरिकन प्रौढ चित्रपट स्टार स्टॉर्मी डॅनियल्सला पैसे दिल्याचा आरोपही आहे. त्याचे नाते लपवण्यासाठी स्टॉर्मी डॅनियलला पैसे दिल्याचा आरोप आहे.

    अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प नेहमी (Donald Trump Viral Video) कोणत्या ना कोणत्या कारणाने वादात सापडत असतात. यावेळी त्यांनी पुन्हा असं काही तरी केलं ज्यामुळे वाद निर्माण झाला आहे. ट्रम्प अमेरिकेतील आयोवा येथे आपला निवडणूक प्रचार करत असताना अचानक ते एका रेस्टॉरंटमध्ये पोहोचले. रेस्टॉरंटमधील एका महिला वेट्रेसने ट्रम्प यांना ऑटोग्राफ देण्यास सांगितले, ट्रम्प यांनी तिला ऑटोग्राफ दिला, मात्र त्यांनी महिलेच्या छातीवर ऑटोग्राफ दिला. त्या महिलेने स्वतः त्यांना तसं करण्यास सांगितलं होतं.
    हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता ट्रम्प यांना त्यांच्या वर्तनामुळे टीकेला सामोरे जावे लागत आहे. यावर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. ट्रम्प यांनी महिलेच्या छातीवर ऑटोग्राफ देण्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधीही 2015 मध्ये त्यांनी निवडणूक प्रचारादरम्यान महिलेच्या छातीवर ऑटोग्राफ दिला होता.

    ट्रम्प आतापर्यंत अनेकदा अडचणीत आले

    1. 2020 च्या निवडणुकीत त्यांचा पराभव पलटवण्याच्या कथित प्रयत्नांमुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जॉर्जियामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, ट्रम्प यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे.
    2. 2020 च्या अध्यक्षीय निवडणुकीचे निकाल उलथवून टाकल्याबद्दल ट्रम्प यांच्या विरोधात एक वेगळा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ज्यामध्ये कॅपिटल हिल हिंसाचाराच्या आरोपांचा देखील समावेश आहे.
    3. ट्रम्प यांच्यावर वरील महत्त्वाच्या कागदपत्रांची चुकीची हाताळणी केल्याचाही आरोप आहे. याच प्रकरणात तपास यंत्रणेच्या कामात अडथळा आणल्याचा आरोपही त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
    4. ट्रम्प यांच्यावर अमेरिकन अॅडल्ट फिल्म स्टार स्टॉर्मी डेनियलला पैसे दिल्याचाही आरोप आहे. त्याच्यावर स्टॉर्मी डॅनियल्सवर त्याचे नाते लपवण्यासाठी दबाव आणल्याचा आणि त्यासाठी तिला पैसे देण्याचा आरोप आहे.

    ट्रम्पबद्दल अमेरिकन लोकांना काय वाटते?

    अमेरिकेतील आगामी निवडणुकांसाठी डोनाल्ड ट्रम्प देशाच्या कानाकोपऱ्यात प्रचार करत आहेत. अमेरिकेच्या क्विनिपियाक युनिव्हर्सिटीच्या सर्वेक्षणानुसार, 46 टक्के अमेरिकन लोकांना ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्ष बनवायचे आहे. यासोबतच, सर्वेक्षणाच्या एका प्रश्नात, देशाला राष्ट्रीय संकटातून बाहेर काढण्यासाठी कोण चांगले काम करेल, असे विचारण्यात आले होते, ज्यावर 51 टक्के मतदारांनी ट्रम्प यांना पाठिंबा दिला. तर 44 टक्के लोकांनी बिडेनचे समर्थन केले.