donald trump

अमेरिकेतील कॅपिटॉल हिलमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर फेसबुक (Facebook) आणि ट्विटर (Twitter) या सोशल मीडिया साईट्सनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कायमची बंदी घातली . मात्र यावरही ट्रम्प यांनी मार्ग शोधला आहे. ते स्वत:ची सोशल मीडिया साईट(donald trump to start his own social media site) सुरू करणार आहेत.

    वॉशिंग्टन : अमेरिकेतील कॅपिटॉल हिलमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर फेसबुक (Facebook) आणि ट्विटर (Twitter) या सोशल मीडिया साईट्सनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कायमची बंदी घातली . मात्र यावरही ट्रम्प यांनी मार्ग शोधला आहे. ते स्वत:ची सोशल मीडिया साईट सुरू करणार आहेत.

    मिळालेल्या माहितीनुसार, या साईटवर ट्रम्प अमेरिकेच्या लोकांसोबत त्यांचे विचार शेअर करतील. त्याचबरोबर इतर व्यक्तींनाही कोणत्याही दडपणाशिवाय मुक्तपणे या साईटवर विचार मांडता येतील.

    यापूर्वी ट्रम्प यांची माजी सल्लागार जेसन मिलन यांनी देखील ट्रम्प लवकरच सोशल मीडियावर परत येतील असा दावा केला होता.

    डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर वादग्रस्त ट्विटमुळे अनेकदा बंदी घालण्यात आली. तसेच त्यांच्यावर खोटी माहिती शेअर केल्याचा आरोपसुद्धा ट्विटरनं केला होता. अमेरिकेतील कॅपिटॉल हिलमध्ये ट्रम्प समर्थकांनी केलेल्या हिंसाचारानंतर  ट्रम्प यांच्या अकाऊंटवर ट्विटरनं अनिश्चित काळासाठी बंदी घातली. ट्विटरनंतर फेसबुक, इन्स्टाग्राम (Instagram) आणि यूट्यूब (YouTube) या सोशल मीडिया साईटने देखील ट्रम्प यांच्यावर बंदी घातली .मात्र ट्रम्प स्वत:चा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म निर्माण करणार आहेत.