Donald Trump's idea to name the airport after himself

२० जानेवारीला बायडेन अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत. यानंतर ट्रम्प यांचा राष्ट्राध्यक्ष पदाचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. मात्र, पद गेल्यानंतरही आपले नाव चर्चेत रहावे आपल्या कामाची दखल घेतली जावी यासाठी एखाद्या विमानतळाला स्वत:च नाव द्यावे असा विचार ट्रम्प यांच्या डोक्यात घोळत आहे.

वॉशिंग्टन : लवकरच ट्रम्प यांचा राष्ट्राध्यक्ष पदाचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. जाता जाता विमानतळाला स्वत:चं नाव देण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा विचार आहे.

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सहकारी आणि सल्लागारांकडे पद सोडण्याआधी एखाद्या विमानतळाला स्वत:च नाव देता येईल का यासंदर्भात विचारणार केली असल्याचे वृत्त आहे.

जर, एखाद्या विमानतळाचे नाव बदलून त्याला स्वत:च नाव द्यायचे असल्यास कोणकोणत्या कागपत्रांची आवश्यकता आहे. यासंदर्भात ट्रम्प यांनी आपल्या सल्लांगारांकडून माहिती मागवली आहे.

दरम्यान २० जानेवारीला बायडेन अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत. यानंतर ट्रम्प यांचा राष्ट्राध्यक्ष पदाचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. मात्र, पद गेल्यानंतरही आपले नाव चर्चेत रहावे आपल्या कामाची दखल घेतली जावी यासाठी एखाद्या विमानतळाला स्वत:च नाव द्यावे असा विचार ट्रम्प यांच्या डोक्यात घोळत आहे.

कोणत्या विमानतळाला ट्रम्प यांचं नाव दिले जाणार याबाबत काही ठोस माहिती नाही. मात्र, पाम बीच इंटरनॅशनल एअरपोर्टला ट्रम्प इंटरनॅशनल एअरपोर्ट असं नाव देण्याची चर्चा आहे.